महिलेला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या दुकलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 11:34 PM2020-02-07T23:34:52+5:302020-02-07T23:35:31+5:30

१३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Duo arrested for raping and murder of a woman to offer her liquor | महिलेला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या दुकलीला अटक

महिलेला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या दुकलीला अटक

Next

मुंबई - पश्चिम उपनगरातील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २८ वर्षीय महिलेला दारू पाजून तिच्यावर सामूहिक पाशवी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. सांताक्रूझ पूर्व परिसरातील मिलिंद नगरमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दुकलीला अटक केली आहे.

महिलेच्या शवविच्छेदनानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी चौकशी करीत सुनील कदम आणि विनोद घाडी नावाच्या दोन आरोपीना अटक केली आहे. त्यांना स्थानिक न्यायालयात नेले असता त्यांना १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली. 

२८ वर्षीय महिला हि संतकरूझ पूर्व भागातील मिलिंद नगरमध्ये राहात  होती. त्याच विभागात राहणारे दोन सफाई कर्मचारी हे नाले सफाईचे काम करीत होते. ते आपल्या मिलिंद नगर परिसरात भाड्याने राहत होते. ते घटनेच्या दिवशी संध्याकाळी दारू पीत होते.  तेव्हा सदर मृतक महिलाही त्यांच्यासोबत दारू पीत होती. महिला मद्यधुंद झाल्यानंतर नशेच्या आहारी गेलेल्या दोघांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला.

त्यानंतर महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिला मारहाण करून तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अत्याचारी आरोपी सुनीलने प्रथम अत्याचार केला, त्यानंतर विनोदने अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. हत्या केल्यानंतर खुनी सुनीलने वाकोला पोलीस ठाण्यात जाऊन महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यात महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची आणि तिचा मृत्यू गळा आवळल्या झाल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी महिलेबाबत चौकशी केली. ती आपल्या बहिणीसोबत याच परिसरात राहत होती. 

Web Title: Duo arrested for raping and murder of a woman to offer her liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.