अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 14:27 IST2022-07-07T14:27:14+5:302022-07-07T14:27:37+5:30
Abu Azmi : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अबू आझमी यांनी सभागृहात विरोध केला होता.

अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराला विरोध केल्यानं अबू आझमी यांना धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी पुण्यात कारवाई केली आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अबू आझमी यांनी सभागृहात विरोध केला होता. फोनवरून दोघांनी अबु आझमींना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुण्यातून दोघांच्या मुसक्या आवळल्या. एक आरोपी नाशिकचा असल्याची माहिती मिळत आहे.रात्री एक वाजता आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, दोघांना थोड्याच वेळात किला कोर्टात हजर करण्यात येईल.