शौचालयात घरमालकाला कोंडून दीड तोळे सोने केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 21:36 IST2022-02-10T21:35:29+5:302022-02-10T21:36:32+5:30
Robbery Case : ही घटना पहूर ता. जामनेर येथील अहिल्याबाई होळकर नगरात बुधवारी मध्यरात्री घडली.

शौचालयात घरमालकाला कोंडून दीड तोळे सोने केले लंपास
जामनेर जि. जळगाव : कोयत्याचा धाक दाखवित एकाला शौचालयात कोंडून ठेवले आणि घरातील दीड तोळे सोने व साडेसात हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. ही घटना पहूर ता. जामनेर येथील अहिल्याबाई होळकर नगरात बुधवारी मध्यरात्री घडली.
अहिल्याबाई नगरात सुधीर पाटील हे भाडेकरू म्हणून राहतात. पत्नी बाहेरगावी गेलेल्या असल्याने पाटील हे घरातच एकटेच होते. बुधवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. पाटील यांनी दरवाजा उघडताच चार ते पाच चोरट्यांनी घरात प्रवेश करीत पाटील यांना धक्काबुक्की केली.
वाईटरित्या कुजलेला होता मृतदेह, खुर्चीवर २ वर्ष मृतावस्थेत पडून होती महिला
चोरटयांनी पाटील यांना कोयत्याचा धाक दाखवित शौचालयात कोंडले अणि घरातील साडेसात हजार व दीड तोळे सोने लंपास केले. पाटील यांनी शौचालयातून आरडाओरड केल्याने आजूबाजूचे रहिवासी घराकडे धावले तोपर्यत चोरटे पसार झाले होते. पाटील यांच्या पत्नी गुरुवारी दुपारी घरी आल्यानंतर दागिन्यांची चोरी झाल्याचे उघड झाले. मात्र याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. घरातून लंपास झालेली बॅग एका शेतात आढळून आली.