बनावट नोटाप्रकरणी स्क्रिप्ट रायटरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:32 AM2019-03-19T05:32:36+5:302019-03-19T05:32:59+5:30
बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी चित्रपट स्क्रिप्ट रायटर देवकुमार पटेल (३७) याला सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने करीत त्याच्याकडून पावणेसहा लाखांच्या नोटादेखील हस्तगत केल्या आहेत.
मुंबई : बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी चित्रपट स्क्रिप्ट रायटर देवकुमार पटेल (३७) याला सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने करीत त्याच्याकडून पावणेसहा लाखांच्या नोटादेखील हस्तगत केल्या आहेत.
जोगेश्वरीत मीना इंटरनॅशनल हॉटेलजवळ काही लोक बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली. त्यानुसार या कक्षाचे प्रमुख महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जोगेश्वरीत सापळा रचला. पटेल त्या ठिकाणी आला असता त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा २०००, ५००, २०० आणि १०० च्या
नोटा त्यांना सापडल्या. या सगळ्या नोटा बनावट असून जवळपास ५ लाख ७८ हजार २०० रुपये किमतीच्या आहेत.
नालासोपाऱ्यात राहणारा पटेल याने ‘ईश्वर एक अपराध’ नामक हिंदी चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिले होते. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.