लॉकडाऊनमध्ये पावती फाडून वसुली करत हाेता बोगस पोलीस; खऱ्या पोलिसांनी फिल्डिंगच लावली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 09:00 PM2020-03-26T21:00:25+5:302020-03-26T21:03:11+5:30

हेमंत अग्रवाल नावाच्या व्यक्तीला बोगस पोलिसांच्या संशयास्पद कृत्यावर संशय आला.

During coronavirus lockdown fake policeman arrested in uttarakhand pda | लॉकडाऊनमध्ये पावती फाडून वसुली करत हाेता बोगस पोलीस; खऱ्या पोलिसांनी फिल्डिंगच लावली

लॉकडाऊनमध्ये पावती फाडून वसुली करत हाेता बोगस पोलीस; खऱ्या पोलिसांनी फिल्डिंगच लावली

Next
ठळक मुद्देसंशयास्पद प्रकरण लक्षात येताच डेहराडून नगरचे पोलीस अधीक्षक श्वेता चौबे यांनी आरोपीला ताबडतोब बॉग पोलीस अधिकारी आरोपीला अटक केली.

डेहराडून - कोरोनासारख्या महामारीत देखील ठगांनी ठगबाजी करण्यास सोडले नाही आहे. बुधवारी उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथे अशा प्रकारची घटना घडली आहे. लॉकडाऊनदरम्यान त्रासलेल्या लोकांच्या असहायतेचा फायदा घेऊन बोगस पोलीस निरीक्षक रस्त्यावर होता. बोगस पोलीस निरीक्षकाने दररोज लोकांना धमकावून पैसे वसूल करण्यास सुरवात केली आणि बनावट पावत्या फाडल्या आहेत. संशयास्पद प्रकरण लक्षात येताच डेहराडून नगरचे पोलीस अधीक्षक श्वेता चौबे यांनी आरोपीला ताबडतोब बॉग पोलीस अधिकारी आरोपीला अटक केली.

डेहराडून एसपी म्हणाले की, 'हेमंत अग्रवाल नावाच्या व्यक्तीला बोगस पोलिसांच्या संशयास्पद कृत्यावर संशय आला. बोगस पोलीस निरीक्षकाने खाकी गणवेश घातला होता. पोलीस अधिकारीसारखा दिसत होता. मात्र संशयास्पद वाटणाऱ्या एकास त्याच्याविरोधात डेहराडून कैंट पोलीस ठाण्यात तक्रार करणे अधिक योग्य वाटले. एसपी सिटीच्या म्हणण्यानुसार, हेमंत अग्रवाल यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निरीक्षकांविरोधात २४ मार्च (मंगळवार) रोजी गुन्हा दाखल करून त्याला पकडण्यासाठी पथके तयार केली गेली. तपासादरम्यान क्षेत्राधिकारी (सर्कल ऑफिसर) मसूरी यांना या बोगस पोलिसांची बरीच विशिष्ट माहिती मिळाली.

बनावट निरीक्षक बुधवारी पकडले
डेहराडून कैंट  पोलीस ठाण्याचे  सीओ मसूरी नरेंद्र पंत, उपनिरीक्षक संजय मिश्रा, राजेश सिंग आणि शिपाई सुभाष यांच्या वेगळ्या - वेगळ्या पथकांनी संशयित निरीक्षकास पकडण्यासाठी घेराव घातला. दरम्यान, 25 मार्च रोजी म्हणजेच बुधवारी पोलीस पथकांना कळले की आरोपीने अनार वाला सर्किट हाउस परिसरातील उत्तराखंड पोलिसांचा हवालदार म्हणून अनेक लोकांना फसवले होते. या पथकाने २५ मार्च रोजी आरोपींना घेराव घालून अटक केली.


आरोपीचा भाऊ पंजाब नारकोटिक्समध्ये काम करतो
डेहराडून पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, “अटक केलेला बोगस पोलीस राजेंद्र उर्फ ​​राजन (वय 32) मूळचा पंजाबच्या जुना दाना मंडी मोगा येथील राहणारा आहे. सध्या कैंत पोलीस ठाण्याच्या परिसरात डेहराडूनमध्ये राहत होता. आरोपीकडून डेहराडून पोलिसांनी 4 हजार रुपयांहून अधिक रक्कम आणि पोलिसांचा गणवेश आणि  स्कूटी हस्तगत केली आहे. आरोपीने पोलिस चौकशीत कबूल केले की त्याचा एक भाऊ पंजाब अमली पदार्थविरोधी विभागात तैनात आहे.

डेहराडून पोलिसांच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, 'लॉकडाऊनदरम्यान जिल्हा पोलिस सर्वसामान्यांसाठी शक्य तितकी मदत करत आहेत. कोरोनामुळे नागरिकांनी घरात स्वतःला लॉकआउट केले. अशा परिस्थितीत पोलीस दारात औषधे, घरातील दैनंदिन गरजा आणि वापरलेल्या वस्तू पुरविण्यात व्यस्त आहेत. यासंदर्भात सहकार्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक डेहराडून, वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी यापूर्वी सूचना दिल्या आहेत.

Web Title: During coronavirus lockdown fake policeman arrested in uttarakhand pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.