जनता कर्फ्यूत पोलीसाच्या मुलीचं धुमधडाक्यात लग्न, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 09:12 PM2020-03-23T21:12:32+5:302020-03-23T21:14:46+5:30
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन, आई साहेब मंगल कार्यालयात झाला विवाह सोहळा
फुलंब्री : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सावंगी हर्सूल येथील आईसाहेब मंगल कार्यालयात रविवारी जमाबंदी आदेश लागू असताना लग्न सोहळा पार पडला. यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वर व वधू पित्यासह मंगल कार्यालयाच्या मालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकीकडे कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना याला प्रतिबंद घालण्यासाठी सरकारच्या वतीने कठोर पावले उचलली आहे. याचाच भाग म्हणून राज्य सरकारने जमाबंदी आदेश लागू केले या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी धारा १४४ लागू केली २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लागलेला असताना औरंगाबाद -जळगाव महामार्गावर सावंगी हर्सूल येथील आई साहेब मंगल कार्यालयात रविवारी रात्री विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यात ८०० लोकांचा सहभाग असल्याची माहिती आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी
दरम्यान यातील कल्याण चाबुकस्वार हे हर्सूल पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असून त्याच्या मुलीचे लग्न बिल्डा येथील प्रलाध साळवे यांच्या मुलासोबत झाले. या लग्न सोहळ्यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हि सहभागी झालेले होते, अशी माहिती आहे. आई साहेब मंगल कार्यालयाचे मालक सुखदेव उत्तम रोडे ,वधू पिता कल्याण चाबुकस्वार,वर पिता प्रलाध साळवे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक विजय पाखरे यांच्या फिर्यादी वरून फुलंब्री पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.