बापरे! लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे वाढले इतके गुन्हे तर २५८ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 07:59 PM2020-06-15T19:59:36+5:302020-06-15T20:03:22+5:30
या सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत २५८ आरोपींना अटक केली आहे.
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४७८ गुन्हे दाखल झाले असून २५८ व्यक्तींना अटक करण्यात आले आहेत. राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४७८ गुन्ह्यांची नोंद १४ जूनपर्यंत झाली आहे.
यामध्ये आक्षेपार्ह व्हॉट्स अॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १९५ गुन्हे दाखल आहेत. टिकटॉक व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी २४ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ९, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी ५१ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत २५८ आरोपींना अटक केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर
अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार
पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात
बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47