लॉकडाऊनदरम्यान जिवंत व्यक्ती मृत बनून रुग्णवाहिकेतून गेली, सापडली पोलिसांच्या तावडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:56 PM2020-04-01T22:56:29+5:302020-04-01T22:58:26+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान सुरानकोट पोलिसांची टीम मंगळवारी गस्तीवर होती
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना आता घरी पोहोचण्याचे विचित्र मार्ग अवलंंबले जात आहेत. पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट येथे पोलिसांनी स्वत: च्या मृत्यूचा कट रचल्याप्रकरणी त्याच्यासह साथीदारांना रुग्णवाहिकेतून गावी जाणाऱ्यांना पकडले आहे.
मात्र, पोलिसांनी सैला गावात पोहोचण्यापूर्वी त्यांचा डाव उधळला. सध्या पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला अटक केली असून चार जणांना अलग ठेवण्यास (क्वारंटाईन) पाठविले आहे. पोलिसांना बनावट मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान सुरानकोट पोलिसांची टीम मंगळवारी गस्तीवर होती. यावेळी खासगी रुग्णवाहिका (पीबी ०२ सीक्यू-666363) पोचली. ती थांबवून चौकशी सुरू केली. जेव्हा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी रुग्णवाहिकेचा तपास केला. तेव्हा मृत व्यक्ती त्यात जिवंत आढळला
यानंतर पोलिसांनी सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांना जिवंत व्यक्तीचे बनावट मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. अटक केलेल्या आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 188, 269, 420, 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.