लॉकडाऊनदरम्यान दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला; पोलिसांच्या दंडुकेशाहीमुळे जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 04:37 PM2020-03-26T16:37:41+5:302020-03-26T16:40:36+5:30
लाठीचार्ज झाल्यानंतर स्वामींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पश्चिम बंगाल - देशभरात कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच, पोलिसांनी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना मारहाण केली. अशा मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता बंगालमधील एका ३२ वर्षीय व्यक्तीचा पोलिसांच्या तावडीत सापडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. हावडा येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्ती बुधवारी दूध घेण्यासाठी बाहेर पडलेला असताना पोलिसांना त्याला मरेपर्यंत मारहाण केली.
लाल स्वामी यांच्या पत्नीने असा आरोप केला की, पोलिसांनी रस्त्यावर जमलेल्या घोळक्यावर लाठीचार्ज केला. लाठीचार्ज झाल्यानंतर स्वामींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लॉकडाउनदरम्यान पोलिसांचे गर्दी होऊ न देणे हे काम आहे. पण आपल्या लाठीने एखाद्याचा जीव जाईस्तोवर मारहाण करणं आणि लोकांना नाहक स देणे हे चुकीचे आहे. आम्हाला आवश्यक सेवांसाठी बाहेर जाण्याची परवानगी आहे, नाही का? असा संतप्त नागरिक सवाल करत आहेत.