लॉकडाऊनमध्ये घरी आलेला नवरा ठरला विवाहबाह्य संबंधात अडसर, पत्नीने केली गळा घोटून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 02:08 PM2020-04-03T14:08:54+5:302020-04-03T14:12:52+5:30
Lockdown : संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम राणीला आणि त्यानंतर तिचा चुलत भाऊ अनिकेत याला ताब्यात घेतले.
आग्रा - लॉकडाऊनमध्ये पाच दिवसांपूर्वी नोएडा येथून खांडा या गावी आपल्या घरी आलेल्या विक्रम सिंग (वय 30) याचा बुधवारी रात्री गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली. पत्नी राणी आणि मावशीचा मुलगा अनिकेत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत या दोघांमधील प्रेमसंबंध उघडकीस आले आहेत. विक्रमला याचा संशय आला. म्हणून त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली.
संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम राणीला आणि त्यानंतर तिचा चुलत भाऊ अनिकेत याला ताब्यात घेतले. विक्रमचे वडील सुरेंद्र सिंग यांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. बरहन पोलीस स्टेशनचे प्रभारी यांनी सांगितले की, राणी देवी आणि प्रताप सिंग यांच्यात प्रेमसंबंधाची बाब समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, बुधवारी रात्री अकरा वाजता राणीने तिचा नवरा विक्रमला बटाटाच्या चोखामध्ये आठ झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. यामुळे रात्री एक वाजेच्या सुमारास विक्रम अस्वस्थ झाला होता, म्हणून त्याने उठून द्राक्षे खाल्ली. तो झोपी जाताच थोड्याच वेळात त्याची हत्या करण्यात आली.
आरोपी प्रतापने विक्रमचे आपल्या मामाची मुलगी राणीशी लग्न लावून दिले होते. राणीला दोन वर्षाचा मुलगा देखील आहे. आरोपीचे वडील आरोपी प्रताप यांचे वडील धर्मवीर सिंह हे दारू तस्कर आहेत. तो हरियाणा येथून दारू आणून पुरवतो. त्याच्याविरोधात बरहन पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी तो तुरूंगातही गेला आहे.
हत्येला आत्महत्या करण्याचा कट रचला जात होता
विक्रमला ठार मारण्याचा आणि आत्महत्या दाखवण्याचा बनाव करण्याचा कट राणी आणि प्रताप यांच्यात शिजला होता, असे पोलिसांनी सांगितले. विक्रमच्या आईने किंचाळवून गर्दी जमवली नाहीतर आरोपी कट शिजवण्यात यशस्वी झाले असते.