कानातले, सुटकेस आणि कार उलगडणार मुलीच्या मृत्यूचे रहस्य, मृतदेह सापडला जळालेल्या अवस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 03:36 PM2022-07-04T15:36:01+5:302022-07-04T15:43:36+5:30
Murder Mystry Case : या पुराव्यांच्या आधारे सध्या पोलिसांची चार पथके सातत्याने कार्यरत आहेत.
दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मृतदेह जाळल्याच्या प्रकरणी गुन्ह्याची उकल पोलिसांना करता आलेली नाही. या जळालेल्या मृतदेहाकडील कानातले, सुटकेस, कार आणि थिनर हे पोलिसांकडे असे पुरावे आहेत की ज्यामुळे हत्या प्रकरणाचे गूढ उकलता येईल. या पुराव्यांच्या आधारे सध्या पोलिसांची चार पथके सातत्याने कार्यरत आहेत.
पोलीस आता कानातल्याच्या माध्यमातून महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलेचा मृतदेह ह्युंदाई वेर्ना कारमधून आणून पेटवून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्या गाडीचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळाहून एक सूटकेस आणि थिनरच्या खुणाही सापडल्या आहेत, कारण थिनर टाकून मृतदेह जाळण्यात आला होता.
पोलीस आता या तिन्ही गोष्टींच्या माध्यमातून मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेच्या मानेवर गळ्यावर जखमेच्या खुणा असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच आधी महिलेची हत्या करून तिचा मृतदेह गाझियाबादला आणून जाळण्यात आला. महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमाही आढळून आल्या आहेत, त्यामुळे महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समजते. त्याचबरोबर बलात्काराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नमुने प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवले आहेत.
कुत्रा भुंकल्याने भडकला, शेपूट पकडून श्वानाला फेकला तर मालकाला लोखंडी रॉडनं धोपटलं
साहजिकच ओळख पटल्यानंतर पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. या जळालेल्या महिलेचा मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर मोठे आव्हान राहिले आहे. अखेर, खून करून जाळल्यानंतर गाझियाबादमध्ये आणलेली ही महिला कोण? गाझियाबाद पोलीस आसपासच्या जिल्ह्यांशीही संपर्क साधत आहेत जेणेकरून महिलेची ओळख पटवून मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल.