आधी सासू - सासऱ्यांना संपवलं, तुरुंगात केली सुनेनं आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 10:59 PM2020-04-28T22:59:51+5:302020-04-28T23:04:31+5:30

नवी दिल्ली - ३५ वर्षीय आरोपी महिलेने तिहार तुरूंगात कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रवीण उर्फ कविता २५ एप्रिलपासून तिहार ...

Earlier, mother-in-law and father-in-law were murdered, while daughter in law committed suicide in jail pda | आधी सासू - सासऱ्यांना संपवलं, तुरुंगात केली सुनेनं आत्महत्या 

आधी सासू - सासऱ्यांना संपवलं, तुरुंगात केली सुनेनं आत्महत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देदाम्पत्याविरूद्ध चावला पोलिस ठाण्यात खुनाचा, आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे  यासंबंधी भारतीय दंड संहितेच्या कलमातील काही कलमान्वये गुन्हा दाखल आहे.२६ - २७ एप्रिलच्या दरम्यान प्रवीणने तिहार जेल क्रमांक 6 मध्ये एक्झॉस्ट फॅन गळफास लावून आत्महत्या केली.

नवी दिल्ली - ३५ वर्षीय आरोपी महिलेने तिहार तुरूंगात कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रवीण उर्फ कविता २५ एप्रिलपासून तिहार मध्यवर्ती कारागृहात बंदिवान होती. सासरा आणि सासूच्या हत्येप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती.

याच आरोपावरून तिच्या नवऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. दीन दयाल उपाध्याय रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले आणि तिच्या मृत्यूचे कारण गळफास लावल्याचे पोलिसांनी सांगितले. पश्चिम दिल्लीचे पोलिस उपायुक्त दीपक पुरोहित यांनी सांगितले की, २६ - २७ एप्रिलच्या दरम्यान प्रवीणने तिहार जेल क्रमांक 6 मध्ये एक्झॉस्ट फॅन गळफास लावून आत्महत्या केली. ओढणीने फास लावला होता. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पुरोहित म्हणाले की, प्रवीणने सासू आणि सासऱ्यांची हत्या करुनही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांनी पुढे सांगितले की, या दाम्पत्याविरूद्ध चावला पोलिस ठाण्यात खुनाचा, आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे  यासंबंधी भारतीय दंड संहितेच्या कलमातील काही कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मालमत्तेच्या वादातून सासू  सासऱ्यांची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 

मुंबई पोलिसांप्रमाणे 'या' ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना द्या

Coronavirus : दिलासादायक! देशात 7027 तर जगात 9,35,115 जणांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई

Coronavirus : राज्यात आतापर्यंत ८१ हजार गुन्हे, पोलिसांवर हल्ल्यांच्या १५९ घटना 

Corona virus : पुणे शहरात ८ पोलिसांना कोरोनाची लागण; शंभरहून अधिक कर्मचारी क्वारंटाईन

Web Title: Earlier, mother-in-law and father-in-law were murdered, while daughter in law committed suicide in jail pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.