देवगिरी एक्सप्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास दरोडा, सापळा रचून दरोडेखोरांना अटक

By मुरलीधर भवार | Published: December 7, 2022 02:51 PM2022-12-07T14:51:42+5:302022-12-07T14:53:28+5:30

रेल्वे पोलिस तत्काळ कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचत सहा दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.

Early morning robbery in Devagiri Express in kalyan, robbers arrested after laying a trap | देवगिरी एक्सप्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास दरोडा, सापळा रचून दरोडेखोरांना अटक

देवगिरी एक्सप्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास दरोडा, सापळा रचून दरोडेखोरांना अटक

Next

कल्याण-नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये आठ ते दहा धारदार दरोडेखोरांनी चाकू आणि ब्लेडचा धाक दाखवत दहा ते पंधरा प्रवाशांना लुटल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. देवगिरी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर या दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याबाबत रेल्वे प्रवाशांनी रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती देताच कल्याण रेल्वे पोलिस तत्काळ कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचत सहा दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच दोन अल्पवयीन मुलांनाही  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहित जाधव , विलास लांडगे, कपिल उर्फ प्रकाश निकम, करण वाहने, राहुल राठोड, निलेश चव्हाण अशी आहेत. तर दोन अल्पवयीन मुलाना रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

मंगळवारी पहाटे पाच सुमारास देवगिरी एक्सप्रेसने कसारा स्थानक सोडल्यानंतर आठ तरुण मेल एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस-1 आणि एस-2 मध्ये शिरले. हे सर्व तरुण नशेत दंग होते .या  तरुणांनी धारदार शस्त्र दाखवत प्रवाशांच्या वस्तू आणि पैसे हिसकावून घेतले. ज्या प्रवाशांनी विरोध केला त्यांना मारहाण केली गेली. हा सर्व प्रकार धावत्या एक्सप्रेसमध्ये जवळपास एक तास सुरू होता. काही धाडसी प्रवाशांनी कल्याण रेल्वे नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिसांचे पथक कल्याण स्थानकात पोहोचले ही गाडी फक्त दोन ते तीन मिनिट कल्याण स्थानकावर थांबते. 

या कालावधीत  रेल्वे पोलिसांनी लूटपाट करणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतले. मेल एक्सप्रेस ठाण्याच्या दिशेने रवाना झाली. कल्याण रेल्वे पोलीस ट्रेनमध्ये होते इतर आरोपींना ठाणे आणि दादरपर्यंत ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. या सर्व आरोपींना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता या आरोपींना न्यायालायने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून औरंगाबादचे रहिवासी आहेत. त्यांनी आतापर्यंत किती गुन्हे केले आहेत याचा तपास सुरू आहे. 
 

Web Title: Early morning robbery in Devagiri Express in kalyan, robbers arrested after laying a trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.