धान्य घोटाळ्यातील बाहेतीला ईडीने केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 06:42 AM2021-06-26T06:42:46+5:302021-06-26T06:42:51+5:30
नांदेड- नांदेड, राज्यभरात गाजलेल्या शासकीय धान्य घोटाळ्यात ईडीने शुक्रवारी इंडिया मेगा ऍग्रो कंपनीचे संचालक अजय बाहेती यांना अटक केली आहे. ...
नांदेड- नांदेड, राज्यभरात गाजलेल्या शासकीय धान्य घोटाळ्यात ईडीने शुक्रवारी इंडिया मेगा ऍग्रो कंपनीचे संचालक अजय बाहेती यांना अटक केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. काही महिन्यापूर्वीच बाहेती यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर कंपनीत त्यांनी उत्पादन ही सुरू केले होते.
कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एमआयडीसी भागात अजय बाहेती यांची इंडिया मेगा ऍग्रो अनाज या नावाची कंपनी आहे. या कंपनीत शासकीय धान्याची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक चद्रकिशोर मीना यांना मिळाली होती. त्यानंतर मीना यांनी वेगळे पथक नेमून या प्रकरणाचा छडा लावला. वेषांतर करून स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात शासकीय धान्याचे ट्रक इंडिया मेगा कंपनीत जात असल्याचे स्पस्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीच्या संचालक यासह धान्य पुरवठा आणि वाहतूक करणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल केले होते.
अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बाहेती सह अन्य मंडळींची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर बाहेती यांनी परत आपल्या व्यवसायास सुरवात केली होती. परंतु शुक्रवारी ईडीने बाहेती यांना उचलले. बाहेती यांनी जवळपास तीन हजार राशन दुकान आणि 27 गोदाम यांच्या माध्यमातून शासकीय धान्याचा घोळ घातल्याचा आरोप करीत मनी londring च्या आरोपावरून बाहेती यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बाहेती याना आठ दिवसांची ईडी कस्टडी सुनावण्यात आली. या घोटाळ्यात अनेक शासकीय अधिकारी सहभागी असल्याचे ईडी ने नमूद केले आहे