ईडीकडून रियाच्या वडिलांची अॅक्सिस बँकेत चौकशी, वाकोला शाखेतील लॉकरची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 09:47 PM2020-08-27T21:47:21+5:302020-08-27T21:50:49+5:30
Sushant Singh Rajput Suicide : बँक व्यवहारासंबंधी सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता सुशांत सिंगच्या आर्थिक संपत्ती अनियमितता प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्याकडे गुरुवारी कसून चौकशी केली. वाकोला येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेत त्यांच्या व कुटूंबीयांच्या नावे असलेल्या लॉकरची झाडाझडती घेण्यात आली. रात्री नऊ वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. त्याच्या बँक व्यवहारासंबंधी सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
रिया, तिचे आईवडील, भाऊ यांच्यासह सहा जणाविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याबाबत कुटूंबाची व सबंधिताची शेकडो तास चोकशी करण्यात आली आहे. तिचे वडील इंद्रजित यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी काही नागरिक आणि प्रसार माध्यमानी गर्दी केल्याने त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर पडण्यास असमर्थता दर्शविली होती. रियानेही त्याबाबत व्हिडीओ व्हायरल करीत मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर तिच्या निवासस्थानी बंदोबस्त पुरविण्यात आला. पोलिसानी इंद्रजित चक्रवर्ती ताब्यात घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास सांताक्रूझच्या वाकोला येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेत नेले. त्याठिकाणी ईडीचे अधिकारी आले त्यानंतर बँकेचे शटर आतून बंद करून त्याच्याकडे चौकशी सुरु करण्यात आली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?