दिल्ली दारु घोटाळ्यात ईडीही बरबटलेली! ५ कोटींची लाच, सीबीआयने सहा. संचालकाला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 08:41 AM2023-08-29T08:41:52+5:302023-08-29T08:42:10+5:30

दिल्ली दारु नीति घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.

ED is also ruined in Delhi liquor scam! 5 crore bribe, CBI arrested assistent director | दिल्ली दारु घोटाळ्यात ईडीही बरबटलेली! ५ कोटींची लाच, सीबीआयने सहा. संचालकाला केली अटक

दिल्ली दारु घोटाळ्यात ईडीही बरबटलेली! ५ कोटींची लाच, सीबीआयने सहा. संचालकाला केली अटक

googlenewsNext

दिल्ली दारु नीति घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या एका अधिकाऱ्याला ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आले आहे. ईडीमध्ये सहाय्यक संचालक पदावर असलेल्या पवन खत्री या अधिकाऱ्याने आरोपी अमनदीप सिंह ढल्ल याच्याकडून ५ कोटींची लाच घेतली होती. सीबीआयने खत्रीसोबत दोन अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदविली होती. आता तपासानंतर खत्रीला अटक करण्यात आली आहे. 

ईडीच्या विनंतीवरून सीबीआयने दोन आरोपी अधिकारी, सहायक संचालक पवन खत्री आणि अतिरिक्त विभागीय लिपिक नितेश कोहर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणात अन्य आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, व्यापारी ढल्ल, बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण कुमार वत्स, क्लेरिजेस हॉटेलचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर काही लोकांचा समावेश आहे. 
ढल्ल आणि सिंह यांनी दारु घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आरोपींची मदत करण्यासाठी डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २३ या दोन महिन्यांत वत्स यांना ५ कोटी रुपये दिले होते. सांगवानने ढल्लना अटकेपासून वाचविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. याचसाठी सांगवानने वस्त याची ईडी अधिकारी खत्री यांची भेट घडवून दिली होती. 
यानंतर या दोन महिन्यांत वत्सने ढल्लकडून ५०-५० लाख रुपयांच्या हप्त्यांत ३ कोटी रुपये घेतले होते. यानंतर सांगवानने आणखी २ कोटी रुपये मिळाले तर ढल्लचे आरोपींमधून नाव काढून टाकले जाईल असे सांगितले होते. यानंतर पुन्हा चार हप्त्यांमध्ये २ कोटी रुपये दिले गेले. हे पैसे कॅशमध्ये दिले गेले होते. एवढे पैसे देऊनही ढल्लला १ मार्चला ईडीने अटक केली होती. यावर सांगवानने वत्सला हे आदेश वरून आलेत असे उत्तर दिले होते. यानंतर दिलेले पैसे मागे देण्यासाठी बोलणी सुरु झाली आणि सारे बिंग फुटले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे समजले. ईडीने वत्सच्या घरी रेड टाकली आणि घरातून २.१९ कोटी रुपयांची रोकड आणि १.९४ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने सापडले. तसेच त्यांच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये होते. यावर वत्सला ताब्यात घेतले गेले आणि पुढे ईडीच्या अधिकाऱ्यांचे नावही समोर आले. 

Web Title: ED is also ruined in Delhi liquor scam! 5 crore bribe, CBI arrested assistent director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.