अनिल देशमुखांना ईडीने पुन्हा बजावलं समन्स; येत्या सोमवारी बोलावलं चौकशीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:58 PM2021-07-30T19:58:53+5:302021-07-30T20:03:09+5:30
ED issues summons to Anil Deshmukh again : यापूर्वी अनिल देशमुख यांनी तीनदा चौकशीसाठी प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचं म्हटलं होतं. तसंच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. ईडीनं अनिल देशमुख यांना सोमवारी २ ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. याशिवाय अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांना देखील समन्स बजावण्यात आलं असून त्यांनाही ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचं म्हटलं होतं. तसंच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती.
अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं असून त्यांना २ ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल देशमुखांच्या घरी छापे मारले होते. यानंतर ईडीने त्यांना 4 समन्स पाठविले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. तसेच वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत मंगळवारी अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. अनिल देशमुख यांच्या वकीलांनी ईडीकडे ८ दिवसांची मुदत मागितली होती.
The Enforcement Directorate (ED) has issued fresh summons to former Maharashtra home minister Anil Deshmukh and his son Hrishikesh Deshmukh for questioning in connection with an alleged money laundering case. The agency has asked them to appear before it on Monday. pic.twitter.com/qRr3u9BgK4
— ANI (@ANI) July 30, 2021