गोव्यात हॉटेल व्यावसायिकाला ईडीची नोटीस; ३१ ऑगस्टला कार्यालयात हजर राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:08 AM2020-08-29T02:08:17+5:302020-08-29T02:08:26+5:30

ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या हॉटेलच्या दारावर ही नोटीस चिकटविली आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया हिला रद्द केलेल्या व्हॉटस्अ‍ॅप संदेशाबद्दल अधिकाºयांनी विचारणा करून काही संदेश प्राप्त केल्याची माहिती मिळते.

ED notice to hotelier in Goa; Be present at the office on 31st August | गोव्यात हॉटेल व्यावसायिकाला ईडीची नोटीस; ३१ ऑगस्टला कार्यालयात हजर राहा

गोव्यात हॉटेल व्यावसायिकाला ईडीची नोटीस; ३१ ऑगस्टला कार्यालयात हजर राहा

Next

पणजी : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मनी लॉण्ड्रिंगच्या दिशेने तपास करणाऱ्या सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याला 31 रोजी चौकशीकरिता उपस्थित राहण्यासाठी नोटिस बजावली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या हॉटेलच्या दारावर ही नोटीस चिकटविली आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया हिला रद्द केलेल्या व्हॉटस्अ‍ॅप संदेशाबद्दल अधिकाºयांनी विचारणा करून काही संदेश प्राप्त केल्याची माहिती मिळते. अमली पदार्थ व्यवहारप्रकरणी हे संदेश असल्याचा कयास आहे. हणजुण येथील गौरव आर्या याच्या मालकीच्या ‘हॉटेल टॅमेरिंड’ला ईडीच्या अधिकाºयांनी भेट दिली असता ते बंद आढळले. त्यामुळे हॉटेलच्या दरवाजावर नोटिस चिकटविण्यात आली. आर्या याला ३१ रोजी मुंबईत सकाळी ११ वाजता ईडीचे सहायक संचालक राजीव कुमार यांच्यासमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजावले आहे. आर्या याच्या मालकीचे ‘कॅफे कोटिंगा’ हे अन्य एक आस्थापनही गोव्यात आहे. मात्र हॉटेल आणि हे आस्थापन लॉकडाऊनपासून बंदच आहेत.

गोव्यात रिसॉर्ट असलेला हॉटेल उद्योजक गौरव आर्या या प्रकरणात एनसीबीच्याही रडारखाली आहे. अलीकडेच वागातोर येथे झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थाच्या पुरवठ्याचे गूढही याच प्रकरणाशी जोडले जात आहे. दिल्लीहून या तपासकामाची सूत्रे हलविली जात आहेत. संशयित रिया चक्रवर्ती व गौरव आर्या यांच्यातील कथित व्हॉटस्अ‍ॅप संभाषण हाती लागल्याचा दावा तपास एजन्सीने केला आहे.

मुंबई पोलिसांवर राजकीय दडपण : आठवले
नवी दिल्ली : मुंबई पोलीस राज्य सरकारच्या दबावात काम करीत असल्याने अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांचे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी सर्वप्रथम मी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे दिल्यानंतर मी सुशांतसिंह यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळणार असल्याचा विश्वास दिला, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दिली.
‘लोकमत’शी बोलताना आठवले म्हणाले, मुंबई पोलीस कोणत्याही प्रकरणाचा छडा केवळ २४ तासांमध्ये लावत असते; परंतु सुशांतसिंहप्रकरणी दोन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही काहीच प्रगती दिसत नव्हती.

Web Title: ED notice to hotelier in Goa; Be present at the office on 31st August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.