'जेट एअरवेज'च्या गोयल यांच्या घरावर ईडीची छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:13 PM2020-03-05T18:13:15+5:302020-03-05T18:15:29+5:30
बुधवारी सकाळी ४ ईडीने नरेश गोयल यांना समन्स पाठवले होते.
ठळक मुद्देआज पहाटे ४ वाजेपर्यंत ही ईडीने कारवाई केली.नरेश गोयल यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीने छापा टाकला.
मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणातील कथित प्रकरणी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील पेडर रोड येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. नरेश गोयल यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीने छापा टाकला. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. त्याआधी बुधवारी सकाळी ४ ईडीने नरेश गोयल यांना समन्स पाठवले होते. कर वाचवण्यासाठी नरेश गोयल यांनी देशातील आणि पदेशातील कंपन्यांमध्ये देवाण-घेवाण केली होती. तसेच पैसा देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे. आज पहाटे ४ वाजेपर्यंत ही ईडीने कारवाई केली. नरेश गोयल यांचा जबाब देखील नोंदविण्यात आला आहे.
‘जेट एअरवेज’च्या गोयल दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल