पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडीचा छापा; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कसून चौकशी  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 06:13 PM2021-01-15T18:13:10+5:302021-01-15T18:20:03+5:30

आतापर्यंत शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संचालक आणि विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना गुन्हे शाखेने अटक केली होती.

ED raids Shivajirao Bhosale Sahakari Bank in Pune; Inquiry into financial misconduct case | पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडीचा छापा; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कसून चौकशी  

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडीचा छापा; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कसून चौकशी  

googlenewsNext

पुणे : शिवाजीनगर येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर सक्तवसुली संचालनालया(ईडी) च्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी( दि. १५) छापा टाकला आहे. यामध्ये बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी  करण्यात येत आहे. हे छापे बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर टाकण्यात आले आहेत. 

आतापर्यंत शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संचालक आणि विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना गुन्हे शाखेने अटक केली होती. या प्रकरणी भोसले यांच्यासह इतरांवर बँकेत ७१ कोटी ७८ लाख रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे 2018-19 चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती. तसेचआमदार अनिल भोसले यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. यामध्ये त्यांच्या दोन महागड्या गाड्या आणी महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. गुन्ह्यातील सहकारी पडवळ याची देखील एक गाडी जप्त करण्यात आली आहे.  या तिन्ही गाड्यांची किंमत 1 कोटी 23 लाखांच्या घरात आहे. जप्त करण्यात आलेल्या गाड्या शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.  

भोसले यांच्या मालकीच्या आणखी दहा ते बारा गाड्यांवरही जप्ती आणण्याची तयारी सुरु आहे. लॉकडाऊनपुर्वी भोसले यांच्यासह 16 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे इतर कार्यवाहीस थोडा विलंब झाला होता. या गुन्हयासंदर्भात एमपीआयडी न्यायालयात दोषारोपपत्रही मे महिन्यात सादर झाले आहे. 

आर्थिक गुन्हे शाखेने 30 ते 32 कोटी किंमत असलेल्या 18 मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यांची जवळपास 170 बॅंक खाती गोठवण्यात आली आहेत, यामध्ये दोन कोटी रुपयांची रक्कम आहे. या प्रकरणात आता पर्यंत 153 कोटी हुन अधिक रक्कमेचा गैर व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: ED raids Shivajirao Bhosale Sahakari Bank in Pune; Inquiry into financial misconduct case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.