ED Action On Raj Kundra: शिल्पा शेट्टीच्या घरावर धाडी पडणार; राज कुंद्राच्या सीडींमागे ईडी लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 08:12 AM2022-05-19T08:12:34+5:302022-05-19T09:48:28+5:30
मुंबईतील एका बंगल्यामध्ये राज कुंद्रा पॉर्न फिल्म तयार करत होता. तसेच त्या काही खास अॅपवर प्रसिद्ध करून करोडो रुपये उकळत होता. हा गोरखधंदा काही वर्षे सुरु होता.
बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या मागची शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाहीएत. काही महिन्यांपूर्वी तिचा पती राज कुंद्रा अश्लिल चित्रपट बनविण्याच्या आरोपाखाली अडकला आहे. आता त्याच्यावर ईडीने देखील गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांतही गुन्हा दाखल असून गेल्या वर्षी २० जुलैला राज कुंद्राला अटक करण्यात आली होती.
मुंबईतील एका बंगल्यामध्ये राज कुंद्रा अश्लिल फिल्म तयार करत असल्याच्या आरोपाने खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांमध्ये या प्रकरणी आधीच गुन्हा नोंद आहे. आता ईडीने पैशांची अफरातफर, परदेशातून झालेले पैशांचे व्यवहार यांची चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra | ED (Enforcement Directorate) has registered a money laundering case against businessman Raj Kundra in connection with the pornography case, Mumbai Police also registered a case against him in 2021.
— ANI (@ANI) May 19, 2022
मुंबई पोलिसांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी धाड टाकली आणि राज कुंद्राला अटक केली. HotShots हे अॅप वापरले जात होते. तपासामध्ये हे अॅप युकेच्या Kenrin चे होते, परंतू ते राज कुंद्राच्या Viaan या कंपनीकडून चालविले जात होते असे आढळले. या दोन्ही कंपन्यांमध्ये करार होता. Kenrin ची मालकी राज कुंद्राच्या जवळच्या व्यक्तीकडे होती, तो ब्रिटनमध्ये राहतो. कुंद्रासह कंपनीचा आयटी हेड हेड रेयान थोरपे याला देखील अटक करण्यात आली होती.