टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरच्या व्यावसायिकाची कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 10:13 PM2019-11-26T22:13:59+5:302019-11-26T22:15:58+5:30
व्यावसायिक झहूर अहमद शाह वटाली याची अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे.
नवी दिल्ली - टेरर फंडिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काश्मीरचे व्यापारी झहूर अहमद शाह वटाली आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची 6.20 कोटींची मालमत्ता मंगळवारी जप्त केली. ही मालमत्ता जमिनीच्या स्वरूपात जम्मू-काश्मीरमधील सुजीत गोरीपोरा, तहसील नरबळ, जिल्हा बडगाम या गावात आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार ३१ ऑगस्ट रोजी काश्मीरमधील व्यापारी झहूर याची टेरर फंडिंग प्रकरणात १. ७३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. झहूर अहमद शाह वटाली यांच्या कुटुंबाकडे १. ४८ कोटींची स्थावर मालमत्ता होती आणि दिल्लीतील जम्मू-काश्मीर बँकेच्या शाखेत त्यांची २ लाखांची रक्कम जप्त करण्याचे मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत आदेश देण्यात आले होते.
पाकिस्तानात बंदी घातलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जमीद - उद - दवा यांचा म्होरक्या हाफिज सईद यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपात व्यावसायिक झहूर अहमद शाह वटाली याची अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे.
ED takes possession of immovable properties worth ₹ 6.20 crores of Zahoor Ahmad Shah Watali and his family members in the case of terror financing by Hafiz Muhammad Saeed (Founder of Lashkar-e-Taiba and Jamaat-Ud-Dawa) and others under PMLA .
— ED (@dir_ed) November 26, 2019