दाऊदच्या भावासाठी ईडीची न्यायालयात धाव; सलीम फ्रुटची ९ तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:59 AM2022-02-17T10:59:19+5:302022-02-17T11:00:10+5:30

मंगळवारी सकाळी ईडीने सलीमला डोंगरी भागातून ताब्यात घेतले होते. सलीम फ्रुट हा अनेकदा बनावट कागदपत्रांवर पाकिस्तानमध्ये गेला असून, तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून मुंबईत काम करत असल्याचा संशय ईडीला आहे.

ED's run to court for Dawood's brother; 9 hours thorough interrogation of Salim Fruit | दाऊदच्या भावासाठी ईडीची न्यायालयात धाव; सलीम फ्रुटची ९ तास कसून चौकशी

दाऊदच्या भावासाठी ईडीची न्यायालयात धाव; सलीम फ्रुटची ९ तास कसून चौकशी

Next

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तेतील मनी लाँड्रिंग प्रकरणात, सक्तवसुली संचालनालयाने छोटा शकीलचा निकटवर्तीय सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट याची ९ तास चौकशी केली. काही कागदपत्रे सादर करण्यासाठी त्याला उद्या पुन्हा बोलावण्यात आले आहे. दुसरीकडे दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या कोठडीसाठी ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केल्याने १८ फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश ईडीला दिले. 

ईडीच्या हाती लागलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांच्या आधारे कासकरला अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये एका खंडणी प्रकरणात अटक केली होती. ठाणे पोलिसांनी इक्बाल, अनिस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या वसुलीच्या गुन्ह्यासंबंधित कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने दाऊदशी संबंधित एका प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात काही मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती समोर आली होती. त्याआधारे ईडीने मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल करत, मंगळवारी मुंबईत ९ आणि ठाण्यातील एका ठिकाणी छापेमारी केली. यादरम्यान हाती लागलेल्या कागदपत्रांतून  महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. 

मंगळवारी सकाळी ईडीने सलीमला डोंगरी भागातून ताब्यात घेतले होते. सलीम फ्रुट हा अनेकदा बनावट कागदपत्रांवर पाकिस्तानमध्ये गेला असून, तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून मुंबईत काम करत असल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने फ्रुटसह दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचे बँक खाते आणि संपत्तीची माहिती गोळा केली आहे. ईडीचे एक पथक इक्बालच्या भेंडी बाजार येथील घरी पोहोचले होते. मात्र तेथे कोणीही आढळले  नव्हते. इक्बाल कासकरच्या कोठडीसाठी ईडीने बुधवारी न्यायालयात अर्ज केला. ही टोळी खंडणी, तडजोड आणि ड्रग्जद्वारे पैसे गोळा करून त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी किंवा हवालाद्वारे राष्ट्रविरोधी कारवाया करण्यासाठी करत असल्याचा संशय ईडीला आहे.

Web Title: ED's run to court for Dawood's brother; 9 hours thorough interrogation of Salim Fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.