दोन दिवसांत निकाल! विद्यार्थीनीच्या खुन्याची फाशी लाईव्ह टेलिकास्ट करा; इजिप्त न्यायालयाचे खतरनाक आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:46 PM2022-07-25T20:46:17+5:302022-07-25T20:46:49+5:30
नायरा अशरफ ही २१ वर्षीय विद्यार्थिनी होती. कैरोपासून काही अंतरावर 20 जूनला तिच्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली होती.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर विविध देशांत खतरनाक शिक्षा दिल्या जातात. इजिप्तच्या न्यायालयाने एका आरोपीला फाशीचीच शिक्षा सुनावली असली तरी त्याचे संपूर्ण देशाला लाईव्ह टेलिकास्ट करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
नायरा अशरफ या विद्यार्थीनीच्या खुन्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. जे निष्पाप मुलींना खेळणी समजतात त्यांना धडा शिकविण्यासाठी शिक्षा झाली पाहिजे. असा विचार करणाऱ्यांचा आत्मा हादरला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
नायरा अशरफ ही २१ वर्षीय विद्यार्थिनी होती. कैरोपासून काही अंतरावर 20 जूनला तिच्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली होती. मोहम्मद अदाल असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अदाल हा विद्यापीठात तिचा सिनिअर होता.
या घटनेच्या बरोबर 3 दिवसांनी म्हणजेच 23 जून रोजी जॉर्डनमध्ये याच वयाच्या इमान रशीदची हत्या करण्यात आली. मारेकरी तिचा वर्गमित्र होता. पोलिस मारेकऱ्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
नायरा हत्या प्रकरणी गेल्याच महिन्यात सुनावणी झाली. अदालने आपला गुन्हा कबुल केला. त्याला नायराशी लग्न करायचे होते. तिने नकार दिल्याने रागाच्या भरात तिचा खून केला, असे तो म्हणला. कोर्टाने दोनच दिवसांत त्याला फाशीची शिक्षा सुनावली.