पती झाला हैवान! पत्नीचा काटा काढला, 'तो' सेल्फी थेट तिच्या माहेरी पाठवला; नंतर केलं FB लाईव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 08:13 PM2023-01-11T20:13:33+5:302023-01-11T20:19:19+5:30
नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीच हैवान झाला आहे.
इजिप्तमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीच हैवान झाला आहे. एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, पतीने अत्यंत क्रूर पद्धतीने आपल्या पत्नीचे डोकं शरीरापासून वेगळं केलं. इतकंच नाही तर खून केल्यानंतर त्या विक्षिप्त व्यक्तीने मृतदेहाशेजारी बसून सेल्फीही काढला आणि तो फोटो पत्नीच्या माहेरी तिच्या कुटुंबीयांना पाठवला.
इजिप्तच्या उत्तरेकडील दकाहलिया प्रांतातील तिरा या छोट्याशा गावात ही भयंकर घटना घडली आहे. 9 वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रॉडकास्टर अल अरेबियासह इजिप्शियन आणि पॅन-अरब मीडियाच्या वृत्तानुसार, हमादा एल अगौज नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या कुटुंबाला हत्येनंतरचे फोटो पाठवले आणि फेसबुक लाईव्ह देखील केलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हत्येच्या घटनेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर तिरा गावातील रहिवाशांनी पोलिसांना तातडीने या धक्कादायक घटनेची माहिती दिली. तक्रारीनंतर, इजिप्शियन पोलीस घटनास्थळी गेले आणि त्य़ावेळी तो माणूस अजूनही आपल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ बसलेला पाहून त्य़ांना धक्काच बसला. पोलीस अधिक तपास करत असून त्याला अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"