आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक
By शीतलकुमार कांबळे | Updated: July 13, 2022 16:42 IST2022-07-13T14:09:13+5:302022-07-13T16:42:18+5:30
Crime News : या आठही आरोपींना दोन दिवसांची नव कोठडी सुणावण्यात आली आहे.

आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक
सोलापूर : पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त भरलेल्या यात्रेत वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली. वन परिक्षेत्र पंढरपूर अंतर्गत वन विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. आठ जणांना दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या साहित्यात हात्ताजोडी - 45, वन्य प्राण्यांची नखे- 148, कस्तुरी मृग सदृष्य गोळे - 242, अस्वलाचे केस, हरणाचे कातडे - 1 (250 मिलीग्रॅम), वाघ सदृष्य वन्यप्राण्याचे अवयव - 28 व नखे - 20 यांचा समावेश आहे. काळी जादू, चेटूक, भानामती, भूत काढणे आदीसाठी अंधश्रद्धेतून याची विक्री केली जाते. या प्रकरणात मिल्टर मलमलशा भोसले, जडबूख मवडर पवार, बगलेबाई अंकूश पवार, छायाबाई अंकूश पवार, पूजा सुरेश पवार, बादल शाम पवार, सुहाना नाफरिया पवार, मालाश्री नवनाथ पवार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आठही आरोपींना दोन दिवसांची नव कोठडी सुणावण्यात आली आहे.