मेणात लपवले आठ किलो सोने! विमानतळावर पकडले एक कोटींचे सोने, आखाती देशाच्या नागरिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 06:00 AM2023-01-28T06:00:08+5:302023-01-28T06:00:31+5:30

सोन्याच्या पावडरीची किंमत १ कोटी २० लाख रुपये इतकी आहे.

Eight kg of gold hidden in wax 1 Crore worth of gold seized at airport Gulf country national arrested | मेणात लपवले आठ किलो सोने! विमानतळावर पकडले एक कोटींचे सोने, आखाती देशाच्या नागरिकाला अटक

मेणात लपवले आठ किलो सोने! विमानतळावर पकडले एक कोटींचे सोने, आखाती देशाच्या नागरिकाला अटक

googlenewsNext

मुंबई :

प्रजासत्ताक दिनी दुबईतून मुंबईत आलेल्या एका आखाती देशातील नागरिकाने तस्करीच्या माध्यमातून आणलेली अडीच किलो सोन्याची पावडर कस्टम विभागाने जप्त करत त्याला अटक केली आहे. या सोन्याच्या पावडरीची किंमत १ कोटी २० लाख रुपये इतकी आहे.

दुबईतून मुंबईत येणाऱ्या फ्लाय दुबई एअरलाइनच्या विमानाद्वारे सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ही व्यक्ती विमानातून उतरून ग्रीन चॅनलमधून बाहेर पडली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत, त्याची चौकशी केली. यानंतर, त्याच्याकडील २४ कॅरेट सोन्याची पावडर जप्त करत त्याला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव नबील मूर्तजा नजाह (५७) असे आहे.

मेणाच्या गोळ्यात लपवून आणलेले ८ किलो सोने कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी १४ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी तब्बल ११ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. शारजा येथून मुंबईत आलेले हे प्रवासी सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. मेणाच्या लहान गोळ्या करून त्यात हे सोने दडवले होते आणि या मेणाच्या गोळ्या शरीरात लपविल्या होत्या.

Web Title: Eight kg of gold hidden in wax 1 Crore worth of gold seized at airport Gulf country national arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.