मीरारोडमधील इमारतीत जुगार खेळणाऱ्या महिलांसह ८ जणांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 09:03 PM2021-12-09T21:03:38+5:302021-12-09T21:04:06+5:30
Gambling Case : पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. जुगार खेळणाऱ्यात महिलांचा पण समावेश आहे.
मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी एका इमारतीतील सदनिकेत छापा मारून जुगार खेळणाऱ्या ८ जणांना पकडले व रोख व जुगाराचे साहित्य मिळून ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नया नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे व धनंजय गर्जे सह पाटील , थोरात , तारडे , गुरव यांच्या पथकाने रात्री कानूंगो इस्टेट मधील साई पुष्पक इमारतीतल्या एका सदनिकेत मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड टाकली . त्यावेळी संदेश येलप्पा विरकर (४०) व सोनल रावजी चव्हाण (३७) दोघेही रा . मोगरापाडा,अंधेरी ; मंगल प्रसाद शोभनाथ (६२) व किशोर अमृतलाल गडा (५५) दोघेही रा . शांतीनगर सेक्टर ३, मीरारोड ; विजय आनंदभाई मांडलिया (४६) रा . एक्सर तलावाजवळ, बोरीवली ; मीना शांतीभाई परमार (५२) रा . बेव्हर्ली पार्क, मीरारोड; गिता नितीन रुगानी (५०) रा . मिलाप पीव्हीआरच्या मागे, कांदीवली ; शोभा अशोक हरसोरा (५१) रा . कानुंगो इस्टेट, मीरारोड अशी पत्त्यांचा जुगार खेळताना पकडलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. जुगार खेळणाऱ्यात महिलांचा पण समावेश आहे.