चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची आठ पथके तैनात
By राजेश भोस्तेकर | Published: August 22, 2023 01:55 PM2023-08-22T13:55:24+5:302023-08-22T13:55:38+5:30
रायगड पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आणि कोकण रेल्वेचे कर्मचारी चंद्रकांत कांबळे ड्युटीवर असताना यांच्या डोक्यात गोळी झाडून अत्यंत निर्घृण
हत्या केल्याचा धक्कादायक व खळबळजनक प्रकार सोमवारी घडला आहे. चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, बी डी डी एस टीम, फिंगर एक्सपर्ट टीम व अन्य पथके आणि ९० पोलिस कर्मचारी याकामी गतिमानतेने तपास करीत आहेत.
या घटनेने आंबेडकरी बहुजन समाज आक्रमक झाला आहे. मंगळवारी कोलाड मध्ये बंद पुकारला आहे. त्यामुळे रायगड पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.