भयंकर! लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने 7 मुलांनी केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 03:58 PM2020-08-31T15:58:10+5:302020-08-31T16:08:34+5:30
पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांना या प्रकरणी अटक केली असून एक जण फरार असल्याची माहिती मिळत आहे.
आगरतळा - देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच अनेक धक्कादायक घटना घडत आहे. बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक भयंकर घटना त्रिपुरातील एका गावामध्ये घडली आहे. लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने 7 अल्पवयीन मुलांनी 8 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना अटक केली असून एक जण फरार असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरातील एका गावामध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. गावात राहणाऱ्या काही अल्पवयीन मुलांनी आठ वर्षाच्या मुलीला लपाछपी खेळण्यासाठी बोलावलं. याच दरम्यान खेळताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घरी परत आल्यावर घडलेला सर्व प्रकार हा आपल्या कुटुंबीयांना सांगितला. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
ही कसली आई? दोन मुलींची केली हत्या अन्...https://t.co/sm2kKOL6eC#crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2020
मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बलात्कार करणारी सातही अल्पवयीन मुलं ही गावातील आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलांपैकी चौघांची रवानगी पोलिसांनी बालसुधारगृहात केली आहे. तर दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
माणुसकीला काळीमा! दंड न भरल्याने पंचांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना घडली होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. महिलेवर अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि पंचायतीने तिला एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र एवढा दंड भरणं महिलेला शक्य झालं नाही. दंड न भरल्याने पंचांनी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
मोठ्या अधिकाऱ्याच्या घरात झालेल्या डबल मर्डरमुळे खळबळ, जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरणhttps://t.co/u8Hgdg00jX#MurderMystery#crime
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2020
विकृतीचा कळस! 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार
इस्रायलच्या इलट शहरातही काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. एका हॉटेलमध्ये 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली होती. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'मानवतेविरोधातील गुन्हा' अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याची माहिती समोर आली होती.
नेत्याच्या आत्महत्येने परिसरात खळबळ https://t.co/gn94SrmaLC#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Suicide
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2020
महत्त्वाच्या बातम्या
ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...
"...तर 2024 ही भारतीय राजकारणातील अंतिम निवडणूक ठरेल"
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
धक्कादायक! कोरोनाग्रस्त नेत्याने रुग्णालयातून काढला पळ, पुलावरुन उडी मारुन केली आत्महत्या