९ तासांच्या कसून झालेल्या चौकशीनंतर एकनाथ खडसे ईडी कार्यालयातून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 08:26 PM2021-07-08T20:26:59+5:302021-07-08T20:27:44+5:30

Eknath Khadse :एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंगळवारी सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली होती

Eknath Khadse out of ED office after 9 hours of thorough interrogation | ९ तासांच्या कसून झालेल्या चौकशीनंतर एकनाथ खडसे ईडी कार्यालयातून बाहेर

९ तासांच्या कसून झालेल्या चौकशीनंतर एकनाथ खडसे ईडी कार्यालयातून बाहेर

googlenewsNext
ठळक मुद्देमी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझी चौकशी सुरु झाली. हे कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. यामुळे यात राजकीय हेतू असल्याचे खडसे म्हणाले.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज नऊ तास मॅरेथॉन चौकशी झाली. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. खडसे यांचे वकील प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले. काही कागदपत्रे देखील दिली. यापुढे जेव्हा कधीही ईडी बोलवेल तेव्हा आम्ही हजर राहू असे देखील वकील पुढे म्हणाले.   

एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंगळवारी सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली होती. ईडी न्यायालयाने त्यांना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. यानंतर एकनाथ खडसेंना चौकशीसाठी समन्स पाठविले होते. यावर खडसेंनी ही राजकीय हेतूने प्रेरित कारवाई असल्याचा आरोप केला. तसेच आपण ईडीला सहकार्य करणार असून त्यांना हवी असलेली माहिती मी देणार आहे. परंतू मला यात राजकीय वास येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा भूखंड खासगी आहे. एमआयडीसीने सांगावे की तो भूखंड आपला आहे, जमीन मालकाला मोबदला दिला आहे, असे सांगितल्यास मी दोषीच असेन. कुछ तो होने वाला है, असे मेसेज जळगावात फिरत आहेत. पातच वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा काढले, मला अडकविण्याच प्रयत्न असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. 

मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझी चौकशी सुरु झाली. हे कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. यामुळे यात राजकीय हेतू असल्याचे खडसे म्हणाले. फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. ३१ कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. 

Web Title: Eknath Khadse out of ED office after 9 hours of thorough interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.