Eknath Khadse: 'कुछ तो होने वाला है'! मेसेज जळगावात फिरतायत; एकनाथ खडसेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:20 AM2021-07-08T11:20:03+5:302021-07-08T15:24:31+5:30
Eknath Khadse At ED office: फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. ३१ कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला.
Eknath Khadse At ED office: एकनाथ खडसेंची (eknath khadse) प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ खडसे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात (ED office) उपस्थित राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केले जात होते. मात्र, खडसे यांनीच प्रसारमाध्यमांसमोर येत ईडीच्या ऑफिसमध्ये जात असल्याचे सांगितले. आता खडसे ईडीच्या ऑफिसमध्ये पोहोचले आहेत. (Eknath Khadase came at ED office after illness claim.)
प्रकृती खालावलेली असतानाही एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी हजर
ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी (Girish chaudhary) यांना अटक केली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंगळवारी सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. ईडी न्यायालयाने त्यांना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. यानंतर एकनाथ खडसेंना चौकशीसाठी समन्स पाठविले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांची उद्या दि. ८ जुलै रोजीची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. माध्यमकर्मींनी कृपया याची नोंद घ्यावी. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. धन्यवाद.
— NCP (@NCPspeaks) July 7, 2021
यावर खडसेंनी ही राजकीय हेतूने प्रेरित कारवाई असल्याचा आरोप केला. तसेच आपण ईडीला सहकार्य करणार असून त्यांना हवी असलेली माहिती मी देणार आहे. परंतू मला यात राजकीय वास येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा भूखंड खासगी आहे. एमआयडीसीने सांगावे की तो भूखंड आपला आहे, जमीन मालकाला मोबदला दिला आहे, असे सांगितल्यास मी दोषीच असेन. कुछ तो होने वाला है, असे मेसेज जळगावात फिरत आहेत. पातच वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा काढले, मला अडकविण्याच प्रयत्न असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.
मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझी चौकशी सुरु झाली. हे कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. यामुळे यात राजकीय हेतू असल्याचे खडसे म्हणाले.
फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. ३१ कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.