फक्त 500 रुपयांवरून वाद; मोठ्या भावानं लहान भावाला दिली अशी भयंकर शिक्षा, झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 11:55 AM2021-08-01T11:55:00+5:302021-08-01T11:57:01+5:30
कैमूर जिल्ह्यातील मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोंधी गावात राहणारा रामू मजुरीचे काम करतो. त्याने सांगितले, की त्याचा लहान भाऊ काहीच काम करत नव्हता. त्याला नशा करण्याची सवय लागली होती.
पाटणा - बिहारच्या कैमूर येथे मोठ्या भावाने लहान भावाला अशी शिक्षा दिली, की यात लहान भावाचा मृत्यू झाला. आरोपी लहान भावाकडे त्याला दिलेले 500 रुपये मागत होता. मात्र, लहान भावाने ते देण्यास नकार दिला. यावर, मोठ्या भाऊ संतापला आणि त्याने त्याला दांड्याने मारायला सुरुवात केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, मारण्याच्या नादात लहान भावाचा केव्हा मृत्यू झाला, हेही त्याला कळले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कैमूर जिल्ह्यातील मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोंधी गावात राहणारा रामू मजुरीचे काम करतो. त्याने सांगितले, की त्याचा लहान भाऊ काहीच काम करत नव्हता. त्याला नशा करण्याची सवय लागली होती. अनेक वेळा सांगूनही, त्यात सुधारणा होत नव्हती. आरोपीने सांगितले, की त्याने लहान भावाला 500 रुपये दिले होते. त्यासंदर्भात विचारले असता. लहान भावाने काहीच सांगिले नाही. यानंतर रामू त्याच्याकडे पैसे मागू लागला. मात्र, लहान भावाने पैसे दिले नाही. याचा त्याला अत्यंत राग आला आणि त्यांने लहान भावाला दांड्याने मारहाण केली.
या घटनेनंतर घटनास्थळी स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आणि आरोपी मोठ्या भावालाही अटक केली आहे.
स्थानिक लोकांनी सांगितले, की दोन्ही भावांमध्ये 500 रुपयांवरून वाद झाला. यात मोठ्या भावाने लहान भावाला दांड्याने मारहाण केली. यात लहान भावाचा मृत्यू झाला. यासंदर्भातत पोलिसांनी मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.