फक्त ५०० रुपयांसाठी थोरल्या भावाने धाकट्या भावाचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 10:09 PM2021-08-02T22:09:26+5:302021-08-02T22:10:16+5:30

Murder Case : संतापलेल्या आरोपीने लहान भावाला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

The elder brother took the life of the younger brother for only 500 rupees | फक्त ५०० रुपयांसाठी थोरल्या भावाने धाकट्या भावाचा घेतला जीव

फक्त ५०० रुपयांसाठी थोरल्या भावाने धाकट्या भावाचा घेतला जीव

Next
ठळक मुद्देया मारहाणीत त्याच्या लहान भावाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना बिहारच्या कैमूर येथील आहे.

पाटणा - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका तरुणाने आपल्या लहान भावाचा ५०० रुपयांसाठी जीव घेतला आहे. आरोपी लहान भावाकडे ५०० रुपयांची मागणी करत होता. जे त्याला काही काळापूर्वी आरोपीनेच दिले होते. मात्र, लहान भावाने पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपीला संताप आला. यानंतर संतापलेल्या आरोपीने लहान भावाला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्याच्या लहान भावाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना बिहारच्या कैमूर येथील आहे.

कैमूर जिल्ह्यातील मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोंधी गावात राहणारा रामू मजूरी करतो. त्याच्या लहान भाऊ अल्पवयीन होता. आरोपीने सांगितलं की, लहान भाऊ काहीही काम करत नव्हता. मात्र, त्याला नशेची सवय लागली होती. अनेकदा समजावून देखील तो सुधारला नाही. आरोपीने लहान भावाला ५०० रुपये दिले होते. आरोपीनं त्याला या पैशांबाबत विचारणा केली असता त्याने काहीच सांगितलं नाही. यानंतर रामू त्याच्याकडे आपले पैसे परत मागू लागला. मात्र, लहान भावानं पैसे दिले नाहीत. याचाच राग मनात धरून रामूने लहान भावाला काठीने मारहाण केली.

या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अल्पवीयन मुलाचा मृतेदह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी असलेल्या मोठ्या भावाला अटक केली आहे. केवळ ५०० रुपयांसाठी तरुणाने आपल्या लहान भावाचा जीव घेतला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: The elder brother took the life of the younger brother for only 500 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.