पैसे न दिल्याने वृद्ध वडिलांची मुलाने केली हत्या; भावाने दिली तक्रार
By नंदकिशोर नारे | Published: May 16, 2023 04:00 PM2023-05-16T16:00:27+5:302023-05-16T16:01:20+5:30
आत्माराम धोंडू मुंढे असे मृतकाचे नाव आहे.
वाशिम : पैसे न दिल्याने संतापलेल्या मुलाने आपल्या ७० वर्षीय वडिलांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १६ मे रोजी सकाळी ७ वाजता रिसोड तालुक्यातील पिंपरखेड भगवानबाबा संस्थान येथे उघडकीस आली. सदर घटनेच्या तपासानंतर निर्दयी मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संजय आत्माराम मुंढे असे या आरोपी मुलाचे नाव आहे. आत्माराम धोंडू मुंढे असे मृतकाचे नाव आहे.
याबाबत मृतकाचा भाऊ रामकिसन मुंढे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ आत्माराम हा गेल्या दहा वर्षांपासून रिसोड तालुक्यातील पिंपरखेड, वाडी वाकद बोरखेडी येथील भगवानबाबा संस्थानमध्ये पूजाअर्चा करत होता. मृताचा मुलगा संजय हा वडिलांकडे नेहमी पैशाची मागणी करत होता. पैशाची मागणी पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा .१५ मे रोजी पुन्हा मुलाने बँकेचे मिळालेले पैशाच्या कारणावरून वाद वाद केला होता. मात्र, मृताच्या बहिणीने संजयची समजूत घातल्यानंतर त्याला तेथून काढुन दिले होते. पैसे न दिल्याचा राग मनात ठेऊन संजयने १५ मे रोजी रात्री धारदार शस्त्राने वडिलांची निर्दयीपणे हत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली, सदर माहितीच्या आधारे रिसोड पोलिसांनी घटनेचा तपास वाशिम येथील श्वान पथकाद्वारे केला असता मृतकाचा मुलगा आरोपी संजय मुंढे याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे वाडी वाकद गावात एकच खळबळ उडाली असून मुलाने केलेल्या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे अधिक तपास रिसोड पोलीस करत आहेत.