भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:14 PM2024-10-22T15:14:03+5:302024-10-22T15:23:03+5:30

नितीनने वादानंतर आईकडे ५० रुपये मागितले. तिने नकार दिल्यानंतर त्याने आजी कोठा सुशीला यांना इजा करण्याची धमकी दिली.

elderly woman killed after thrown from balcony by mentally disturbed grandson in secunderabad | भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...

फोटो - आजतक

तेलंगणातील सिकंदराबाद येथील कावडीगुडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातवाने आपल्याच आजीला वेदनादायक मृत्यू दिला. त्याने आजीला बाल्कनीतून फेकून दिलं, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने भांडणानंतर हे भयंकर कृत्य केलं आहे.

कोठा सुशीला असं आजीचं नाव असून त्या ७६ वर्षांच्या होता. आपली मुलगी चल्ला कलावती आणि तिची दोन मुलं नितीन (३२) आणि गोपी (२९) यांच्यासोबत त्या राहत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. २०१५ पासून तो मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे, मात्र तरीही तो नोकरी करत होता.

आईने दिले नाहीत ५० रुपये 

घटनेपूर्वी नितीनचं लहान भाऊ गोपीसोबत भांडण झालं होतं. नितीनने वादानंतर आईकडे ५० रुपये मागितले. तिने नकार दिल्यानंतर त्याने आजी कोठा सुशीला यांना इजा करण्याची धमकी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलावती पाणी भरत असताना नितीनने खुर्चीवर बसलेल्या आजीला दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून खाली रस्त्यावर फेकलं. 

आजी गच्चीवरून पडल्याचं पाहून कलावतीच्या कुटुंबातील इतर सदस्य धावत आले, मात्र आजीने प्रकृती गंभीर होती. जेव्हा रुग्णवाहिका बोलावण्यात आली तेव्हा पॅरामेडिक्सनी पुष्टी केली की सुशीला यांच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चल्ला कलावती यांनी आपला मुलगा नितीनने जाणूनबुजून आजीला मारल्याचा आरोप करत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. नितीनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: elderly woman killed after thrown from balcony by mentally disturbed grandson in secunderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.