दोन बहिणींसह थोरली मुलगी घरातून पळाली, पोलिसांनी आईला 'दिवाळी भेट' दिली!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 05:18 PM2020-11-14T17:18:49+5:302020-11-14T17:21:39+5:30

Crime News : ताईला नको होते लग्न; तिला होते शिकायचे

The eldest daughter along with two sisters ran away from home, the police gave mother a 'Diwali gift'! | दोन बहिणींसह थोरली मुलगी घरातून पळाली, पोलिसांनी आईला 'दिवाळी भेट' दिली!

दोन बहिणींसह थोरली मुलगी घरातून पळाली, पोलिसांनी आईला 'दिवाळी भेट' दिली!

Next
ठळक मुद्दे या तिघींना तिच्या आईच्या ताब्यात देऊन त्यांच्या आईला दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.कल्याण पूव्रेत राहणारी एक महिला आहे. तिला तीन मुली आहेत. या मुलांचे वडिल हयात नसल्याने आईच या तिघींचा संभाळ करते. या तिघी मुली अचानक घरातून गायब झाल्या. घरातून एकाच वेळी तिघींनी पळ काढल्याने त्यांची आई हवालदिल झाली.

कल्याण - घरातील मोठय़ा मुलीच्या लग्नाची तयारी तिच्या आईने केली. तिला लग्न करायचे नाही. तिला शिकायचे होते. तिने तिच्या दोन धाकटय़ा बहिणींनीसह घरातून पळ काढला. पोलिसांनी मोठय़ा शिताफिने या तिघा बहिणांनी शोधून काढले. या तिघींना तिच्या आईच्या ताब्यात देऊन त्यांच्या आईला दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.


कल्याण पूव्रेत राहणारी एक महिला आहे. तिला तीन मुली आहेत. या मुलांचे वडिल हयात नसल्याने आईच या तिघींचा संभाळ करते. या तिघी मुली अचानक घरातून गायब झाल्या. घरातून एकाच वेळी तिघींनी पळ काढल्याने त्यांची आई हवालदिल झाली. तिला मोठा धक्का बसला. मात्र तिने खचून न जाता थेट कोळसेवाडी पोलिस ठाणो गाठले. त्याठिकाणी तिने पोलिसांना सगळी हकीगत सांगितली. तिच्या तीन मुली बेपत्ता झाल्या आहे. पोलिसांनी या महिलेची तक्रार दाखल करुन या मुलींच्या तपासाला गती दिली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी या मुलींचा शोध घेण्यासाठी एक तपास पथक  नेमले. या तपास पथकाची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण वाघ यांच्यावर सोपविली. पोलिसांनी मुलींचा तपास सुरु केला. मुलींचा मोबाईल ट्र्कवर ठेवला. तसेच मुली ज्या व्यक्तिच्या संपर्कात आहेत. त्या व्यक्तिच्या संपर्कात पोलिस होते. हे मुलींना ठाऊन नव्हते. मुलींच्या सोबत काही अनुचित प्रकार घडू नये अशी धास्ती मुलीच्या आईसह पोलिसांनाही होती. मुलीच्या व्यक्तिच्या संपर्कात होत्या. ती व्यक्ति त्या मुलींना घरी परत येण्यासाठी समजावीत होती. या व्यक्तिच्या माध्यमातूनच मुली पनवेल बस स्थानकात आहे अशी माहिती मिळताच पोलिसांनी या मुलींना पनवेल बस स्थानकात गाठले. त्यांना कल्याणला आणले. तिघींना पोलिसांनी त्यांच्या आईच्या हवाली केले. सहाय्यक पोलिस निरिक्षक वाघ यांनी सांगितले की, मोठय़ा मुलीच्या लग्नाची तयारी तिच्या आईने सुरु केली होती. याची चाहूल तिला लागली. तिला लग्न नको होते. तिला शिकायचे होते. त्यामुळे तिने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिच्या धाकटय़ा बहिणींनी तिच्यासोबत जाण्याचे ठरविले. कारण त्या दोघी तिच्या बहिणीशिवाय राहू शकत नव्हत्या.
 

Web Title: The eldest daughter along with two sisters ran away from home, the police gave mother a 'Diwali gift'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.