लज्जास्पद! संपत्ती हडपण्यासाठी मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगठ्याचे घेतले ठसे; नातू म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 01:14 PM2023-04-11T13:14:46+5:302023-04-11T13:15:57+5:30

काही नातेवाईक कमलादेवी यांच्यावर संपत्ती त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत होते.

embarrassing after the death the old woman in agra | लज्जास्पद! संपत्ती हडपण्यासाठी मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगठ्याचे घेतले ठसे; नातू म्हणतो...

लज्जास्पद! संपत्ती हडपण्यासाठी मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगठ्याचे घेतले ठसे; नातू म्हणतो...

googlenewsNext

आग्रा येथे मृत्यू झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगठ्याच्या ठशावरून मृत्यूपत्र तयार करून घर आणि दुकान बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हि़डीओत एका कारमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी तिथे एक व्यक्ती येतो, जो त्या वृद्ध महिलेच्या अंगठ्याचा ठसा घेतो.

सेवला जाट येथील रहिवासी जितेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आजी कमला देवी यांचे 08-05-2021 रोजी निधन झाले. त्यानंतर काही नातेवाईकांनी दवाखान्यात जाताना गाडी थांबवली व वकिलाला बोलावून मृत आजीच्या अंगठ्याचा ठसा मिळवून मालमत्ता हडप केली. ज्याची तक्रार 21-05-2022 रोजी स्टेशन प्रभारी सदर बाजार यांच्याकडे केली होती.

पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नसल्याचा आरोप जितेंद्र यांनी केला आहे. जितेंद्रच्या म्हणण्यानुसार, काही नातेवाईक कमलादेवी यांच्यावर संपत्ती त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत होते. कमला देवी याला विरोध करत असत. 8 मे 2021 रोजी कमला देवी यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले. जितेंद्रकडे एक व्हिडीओ आला होता ज्यानंतर जितेंद्रने कमला देवीची हत्या करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

जितेंद्रने सांगितले की, व्हिडिओमध्ये कमला देवी कारच्या सीटवर मृतावस्थेत पडल्या आहेत आणि काही कागदांवर कमला देवी यांच्या अंगठ्याचा ठसा उमटवताना एक व्यक्ती दिसत आहे. जितेंद्रने सांगितले की, त्याची आजी कमला देवी स्वाक्षरी करायची. जितेंद्रने यापूर्वी आग्रा जिल्हा अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधीक्षक आणि इतर अनेक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. जितेंद्र यांनी आरोप केला की, या प्रकरणाची चौकशी कोणत्याही अधिकाऱ्याने केली नाही किंवा दोषींवर कारवाई केली नाही. या घटनेचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: embarrassing after the death the old woman in agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.