Emotional News: मोखाड्यात भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले; एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 07:56 AM2022-03-06T07:56:03+5:302022-03-06T07:56:13+5:30

घटनेचा निषेध नोंदविताना स्थानिकांनी रास्ता रोको केला. दरम्यान, वाहने शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली. 

Emotional crime News: Two children were crushed by a speeding truck in Mokhada; one serious | Emotional News: मोखाड्यात भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले; एक गंभीर

Emotional News: मोखाड्यात भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले; एक गंभीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मोखाडा/जव्हार : तालुक्यातील नाशिक-जव्हार महामार्गावर असलेल्या मोरचुंडी येथे शनिवारी दुपारी एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. यात दोन बालके चिरडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, चालकाने घाईघाईने ट्रक पुन्हा मागे घेतला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला, तर तेथील एका दुकानालासुद्धा धडक दिली. यात दुकानाचे पत्रे तुटले असून, मोठे नुकसान झाले आहे.

जव्हार-नाशिक मुख्य रस्त्यावर मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये-जा करीत असतात. दुपारी ३.१७ मिनिटांनी जव्हारहून नाशिकच्या दिशेने ट्रक जात होता. चालक नशेत होता. त्याने वाहन हयगयीने चालवीत विरुद्ध दिशेने, तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. यात आरोही नकुल सोनार (वय ५), पायल भालचंद्र वारघडे (वय ९) या दोन मुली जागीच ठार झाल्या, तर एकाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोखाडा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिकांनी केला रास्ता रोको 
nघटनेचा निषेध नोंदविताना स्थानिकांनी रास्ता रोको केला. दरम्यान, वाहने शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली. 
nतर ट्रकने झाडाला धडक दिल्याने ट्रकने पेट घेतल्याने ट्रकचेही मोठे नुकसान झाले.

Web Title: Emotional crime News: Two children were crushed by a speeding truck in Mokhada; one serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.