चालक म्हणून कामाला ठेवलं, पठ्ठ्याने कारच विकून टाकली; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: May 26, 2024 04:44 PM2024-05-26T16:44:00+5:302024-05-26T16:44:08+5:30

शुभम याने आपल्या विश्वासघात करून परस्पर गाडी विकून फसवणूक केल्याचे लक्षात आल्या नंतर जयस्वाल यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

Employed as a driver, Youth sold the car itself; Filed a case in the police station | चालक म्हणून कामाला ठेवलं, पठ्ठ्याने कारच विकून टाकली; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चालक म्हणून कामाला ठेवलं, पठ्ठ्याने कारच विकून टाकली; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मीरारोड - कारवर चालक म्हणून राहतो सांगून एका भामट्याने कार परस्पर दुसऱ्याला विकून कार मालकाची फसवणूक केल्याचा गुन्हा काशिगाव पोलिसांनी दाखल केला आहे. 

काशिगावच्या डाचकुलपाडा भागात राहणारे संतोषकुमार जयस्वाल यांची कार आहे . त्यांच्या कार वर चालक म्हणून राहतो असे सांगून शुभम रामटेके नावाच्या व्यक्तीने खात्री पटावी म्हणून स्वतःच्या आधार कार्ड, पॅन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स ची झेरॉक्स दिली. शुभम याने ओळखीचे पुरावे म्हणून कागदपत्रे दिल्या नंतर जयस्वाल याने शुभम ह्याला गाडी चालवण्यास ठेवले. 

गाडी हातात मिळाल्या नंतर शुभम याने ती परस्पर विकून टाकली . शुभम याने आपल्या विश्वासघात करून परस्पर गाडी विकून फसवणूक केल्याचे लक्षात आल्या नंतर जयस्वाल यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . पोलिसांनी शुभम वर गुन्हा दाखल केला आहे . ३ लाख रुपये किमतीची गाडी विश्वासाने फसवणूक करत विक्री केल्याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी आरोपी शुभम रामटेके याचा शोध चालवला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत . 

Web Title: Employed as a driver, Youth sold the car itself; Filed a case in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.