धक्कादायक! हेल्मेट नसल्याने पेट्रोलला नकार देणे कर्मचाऱ्याला भोवले; चौघांकडून बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:31 AM2021-08-19T10:31:54+5:302021-08-19T10:38:46+5:30

Crime News : धक्कादायक प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून  याबाबत महात्मानगर येथे राहणाऱ्या मिलिंद विवेक कुलकर्णी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Employee beaten for refusing to give petrol due to no helmet in nashik | धक्कादायक! हेल्मेट नसल्याने पेट्रोलला नकार देणे कर्मचाऱ्याला भोवले; चौघांकडून बेदम मारहाण

धक्कादायक! हेल्मेट नसल्याने पेट्रोलला नकार देणे कर्मचाऱ्याला भोवले; चौघांकडून बेदम मारहाण

Next

नाशिक - वाढते अपघात टाळण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी नाशिक शहरात 15 ऑगस्टपासून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' हा उपक्रम सुरू केला आहे. दरम्यान नाशिकमध्ये दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोल पंपावर विना हेल्मेट पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वारांकडे येथील कर्मचाऱ्याने हेल्मेटची विचारणा करत युवकांना पेट्रोल देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरत चौघा जणांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या ज्ञानेश्वर गायकवाड या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे

धक्कादायक प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून  याबाबत महात्मानगर येथे राहणाऱ्या मिलिंद विवेक कुलकर्णी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे. कारण या घटनेने पोलीस आयुक्तांच्या मोहिमेला आव्हान मिळाले असून कायदासवव्यवस्थाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


 

Web Title: Employee beaten for refusing to give petrol due to no helmet in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.