बेंगळुरु विमानतळावर कर्मचाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या; प्रवाशांत उडाली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:24 PM2024-08-28T22:24:48+5:302024-08-28T22:25:02+5:30

सामान्य प्रवाशांना साधी पिन नेणेही शक्य नसताना एअरपोर्टच्या स्टाफची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे.

Employee hacked to death at Bengaluru airport, murder crime news Kempegowda International Airport  | बेंगळुरु विमानतळावर कर्मचाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या; प्रवाशांत उडाली खळबळ 

बेंगळुरु विमानतळावर कर्मचाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या; प्रवाशांत उडाली खळबळ 

बेंगळुरुच्या विमानतळावर मोठी खळबळजनक घटना घडली आहे. सामान्य प्रवाशांना साधी पिन नेणेही शक्य नसताना एअरपोर्टच्या स्टाफची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. केम्पेगौड़ा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली आहे. ट्रॉली ऑपरेटरचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

रामकृष्ण नावाच्या स्टाफची हत्या झाली आहे. पत्नीसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने ही हत्या केली आहे. एवढा मोठा बंदोबस्त असताना विमानतळाच्या इमारतीमध्ये प्रवाशांची येजा असणाऱ्या ठिकाणावर ही हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. 

घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठविला आहे. रमेश नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी रमेशने बॅगमध्ये धारदार शस्त्र ठेवले होते. बसने तो विमानतळावर पोहोचला, बसमधून आल्याने त्याची बॅग स्कॅन झाली नाही. टर्मिनल १ मधील अरायव्हल्स पार्किंग एरियातील शौचालयाजवळ त्याने संधी साधून रामकृष्णवर वार केला. 

रमेशच्या पत्नीचे रामकृष्णसोबत लफडे होते. यामुळे रागातून रमेशने हे कृत्य केले आहे. 

Web Title: Employee hacked to death at Bengaluru airport, murder crime news Kempegowda International Airport 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.