Encounter in Delhi: दिल्लीच्या पॉश परिसरात चकमक, पोलिसांनी हल्लेखोराच्या पायावर झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 08:59 AM2022-04-29T08:59:17+5:302022-04-29T08:59:36+5:30

Delhi Chittaranjan Park Encounter: राजधानी दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या CR पार्कमध्ये आज(शुक्रवार) सकाळी चकमक झाली असून, पोलिसांनी जखमी हल्लेखोराला अटक केली आहे.

Encounter in Delhi: An encounter took place between Delhi Police and criminals in CR park of Delhi, One criminal got injured | Encounter in Delhi: दिल्लीच्या पॉश परिसरात चकमक, पोलिसांनी हल्लेखोराच्या पायावर झाडली गोळी

Encounter in Delhi: दिल्लीच्या पॉश परिसरात चकमक, पोलिसांनी हल्लेखोराच्या पायावर झाडली गोळी

googlenewsNext

Delhi Chittaranjan Park Encounter: राजधानी दिल्लीतील सीआर पार्क परिसरात शुक्रवारी सकाळी पोलिस आणि गुडांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील पॉश भागात झालेल्या या चकमकीत एक गुंड जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी एका गुडांच्या पायावर गोली झाडली असून, त्याला अटक केल्यानंतर रुग्णालयात दाखल केले आहे.

सविस्तर माहिती अशी की, दिल्लीतील या परिसरात काही चोरटे शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी त्यांना घेरले. पोलिसांनी यावेळी आरोपींना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, पण त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. हल्लेखोरांच्या गोळीबारात पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर जखमी झाला. त्याच्या पायाला गोळी लागली आहे.
 

Web Title: Encounter in Delhi: An encounter took place between Delhi Police and criminals in CR park of Delhi, One criminal got injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.