कुख्यात गुंड लालू यादवचा एन्काउंटर, पोलिसांनी ठेवलं होतं लाखोंचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 02:19 PM2021-04-28T14:19:53+5:302021-04-28T14:21:09+5:30

Encounter Of Lalu yadav : कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, काही काडतुसे आणि एक मोटरसायकल जप्त केली.

Encounter of notorious goon Lalu Yadav, the police had placed a reward of lakhs | कुख्यात गुंड लालू यादवचा एन्काउंटर, पोलिसांनी ठेवलं होतं लाखोंचं बक्षीस

कुख्यात गुंड लालू यादवचा एन्काउंटर, पोलिसांनी ठेवलं होतं लाखोंचं बक्षीस

Next
ठळक मुद्दे एक लाख रुपयांचे बक्षीस लावलेल्या लालू यादवची बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलमध्ये प्रचंड दहशत होती.

लखनौ - बिहार आणि उत्तर प्रदेश पूर्वांचल येथे कुख्यात गुंडांवर शोधून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस लावले होते. त्या गुंडाचा बुधवारी पहाटे माऊ जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत खात्मा केला आहे. अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी माऊ जिल्ह्यातील  सराय लखंसी  परिसरातील भंवरेपुरजवळ पहाटे ३.३० वाजता लालू यादव याला घेराव घातला. या चकमकीदरम्यान यादव जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


प्रशांत कुमार म्हणाले की, चकमकीच्या वेळी  चिरैयाकोट  पोलिस स्टेशनचे अध्यक्ष अविनाशकुमार सिंग, निरीक्षक राजेश प्रसाद यादव, उपनिरीक्षक अमित मिश्रा आणि कॉन्स्टेबल विवेक सिंग यांना गोळ्या घालण्यात आल्या. परंतु बुलेट प्रूफ जॅकेट घातल्यामुळे ते सर्वजण बचावले. कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, काही काडतुसे आणि एक मोटरसायकल जप्त केली.


लालू यादव यांना बिहार आणि पूर्वांचलमध्ये खूप दहशत होती

एक लाख रुपयांचे बक्षीस लावलेल्या लालू यादवची बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलमध्ये प्रचंड दहशत होती. त्याच्याविरोधात माऊ जिल्ह्यातील आरटीआय कार्यकर्ते बाळ गोविंदसिंग यांची हत्या, तसेच जौनपूरमध्ये दोन कोटी रुपयांचा दरोडा आणि सुरक्षारक्षकाचा खून आणि २५ लाख रुपये लुटणे यासह एकूण ८२ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

Web Title: Encounter of notorious goon Lalu Yadav, the police had placed a reward of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.