एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक; कारमधील स्फोटके, मनसुख हिरेन हत्या प्रकरण भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 06:55 AM2021-06-18T06:55:35+5:302021-06-18T06:56:20+5:30

शर्माने विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन नालासोपारातून शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

Encounter specialist Pradeep Sharma arrested; Explosives in the car, Mansukh Hiren murder case | एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक; कारमधील स्फोटके, मनसुख हिरेन हत्या प्रकरण भोवले

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक; कारमधील स्फोटके, मनसुख हिरेन हत्या प्रकरण भोवले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : ॲण्टेलिया जवळील कारमधील स्फोटके व ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी वादग्रस्त माजी पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक केली. लोणावळा येथील एका रिसॉर्टवरून त्याला ताब्यात घेण्यात आले तर अंधेरीतील त्याच्या फ्लॅट व फाउंंडेशनच्या कार्यालयावर छापे टाकून महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले.

शर्माने विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन नालासोपारातून शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारींमध्ये  प्रदीप शर्माचाही उल्लेख आहे.  त्यामुळे त्याच्यावरील कारवाई परमबीर सिंग यांच्यासाठीही अडचणीची ठरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. 

एनआयएने आतापर्यंत शर्मा याच्याशिवाय  मुख्य आरोपी असलेला सचिन वाझे, रियाज काझी व सुनील माने या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना, तर लखन भय्या एन्काउंटरमध्ये बडतर्फ असलेल्या विनायक शिंदेला अटक केली आहे. आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.


                         
शर्मासह तिघांना अटक
n एनआयएने गुरुवारी प्रदीप रामेश्वर शर्मा याच्यासह आणखी दोघांना अटक केली. 
n सतीश तिरूपती मोठकुरी 
ऊर्फ तानी भाई ऊर्फ विक्की बाबा (४०, रा. महात्मा जोतीराम फुलेनगर, मालाड, पूर्व) व मनीष वसंत सोनी (४६, रा. चिंचोली 
बंदर, मालाड पश्चिम) अशी त्यांची नावे आहेत.  
n मनसुखच्या हत्येसाठी या दोघांना प्रदीप शर्माने पैसे दिले 
होते. त्याचा मृतदेह रेतीबंदर येथे नेऊन कोठे टाकायचा, हेही या दोघांसह अन्य आरोपींना त्यानेच सांगितले होते, असे सूत्रांनी सांगितले.

आजी-माजी पोलीस गजाआड 
n एनआयएने गेल्या रविवारी पश्चिम उपनगरातील बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना अटक केली. हे दोघेही प्रदीप शर्माच्या फाउंडेशनमध्ये पदाधिकारी होते. हिरेनच्या हत्येवेळी ते उपस्थित असल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्यांच्याकडील चौकशीतून शर्माचाही सहभाग स्पष्ट झाल्याने तपास पथक त्याच्या मागावर होते. 
n गुरुवारी सकाळी त्याला लोणावळ्यातील एका रिसॉर्टवरून ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी अन्य दोन पथकांनी अंधेरीतील त्याचा फ्लॅट व कार्यालयावर  छापा टाकला. जवळपास पाच तासांच्या झडतीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे, रोकड, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आल्याचे समजते.  
n शर्माकडे सुमारे ६ तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर  जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयाने २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. 

Web Title: Encounter specialist Pradeep Sharma arrested; Explosives in the car, Mansukh Hiren murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.