एसीबीचे पथक सात दिवसापासून मागावर; पुसदमध्ये अभियंत्याला लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:21 PM2021-05-25T21:21:43+5:302021-05-25T21:22:12+5:30

Crime news: पुसद नगरपरिषद बांधकाम विभागाने शहरातील नाली बांधकामाचे कंत्राट दिले होते. कंत्राटदाराने हे काम पूर्ण केले. मात्र त्याची देयके काढण्यासाठी पालिकेतील स्थापत्य अभियंता अश्विन रामेश्वर चव्हाण (३१) यांनी लाचेची मागणी केली.

Engineer arrested for taking bribe in Pusad | एसीबीचे पथक सात दिवसापासून मागावर; पुसदमध्ये अभियंत्याला लाच घेताना अटक

एसीबीचे पथक सात दिवसापासून मागावर; पुसदमध्ये अभियंत्याला लाच घेताना अटक

Next

पुसद (यवतमाळ) : शहरात केलेल्या नाली बांधकामाचे देयक काढण्यासाठी नगरपरिषदेतील स्थापत्य अभियंत्याने १४ हजाराची मागणी केली. संबंधित कंत्राटदाराने याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानंतर एसीबीचे पथक सात दिवसापासून मागावर होते. मंगळवारी दुपारी नगरपरिषदेच लाच स्वीकारताना अभियंत्याला अटक करण्यात आली.


पुसद नगरपरिषद बांधकाम विभागाने शहरातील नाली बांधकामाचे कंत्राट दिले होते. कंत्राटदाराने हे काम पूर्ण केले. मात्र त्याची देयके काढण्यासाठी पालिकेतील स्थापत्य अभियंता अश्विन रामेश्वर चव्हाण (३१) यांनी लाचेची मागणी केली. एसीबीच्या पथकाने १८ मे रोजी याची पडताळणी केली. २५ मे रोजी दुपारी सापळा लावण्यात आला. नगरपरिषदेतील प्रसाधनगृहाजवळ अभियंता अश्विन चव्हाण याने १४ हजार रुपये रोख कंत्राटदाराकडून स्वीकारले. त्यानंतर लगेच एसीबी पथकाने आरोपी अश्विन चव्हाण याला अटक केली. त्याच्या विरोधात पुसद शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई एसीबीचे अधीक्षक विशाल गायकवाड, अपर अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक आर.बी. मुळे, जमादार सुरेंद्र जगदाळे, नीलेश पखाले, अनिल राजकुमार, विजय अजमिरे, राहुल गेडाम, राकेश सावसाकडे, सुधाकर कोकेवार यांनी केली.

Web Title: Engineer arrested for taking bribe in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.