इंजिनीअर ‘क्रिप्टो’ आमिषाला भुलला; २५ लाख गमावून बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 07:50 AM2023-09-24T07:50:53+5:302023-09-24T07:51:18+5:30

मोबाइल क्रमांक, बँकेचे खाते, टेलिग्राम आयडीद्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Engineer 'Crypto' lured Amisha; 25 lakh was lost | इंजिनीअर ‘क्रिप्टो’ आमिषाला भुलला; २५ लाख गमावून बसला

इंजिनीअर ‘क्रिप्टो’ आमिषाला भुलला; २५ लाख गमावून बसला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट नफा मिळविण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने एका इंजिनीअर युवकाला सुमारे २५ लाखांना गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित युजर आयडी, मोबाइल क्रमांक, बँकेचे खाते, टेलिग्राम आयडीद्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

संशयित सायबर गुन्हेगाराने या युवकासोबत इंटरनेट, फोनद्वारे संपर्क साधला २६ ते ३१ ऑगस्टदरम्यान त्याला दामदुप्पट नफ्याचे आमिष दाखविले. 
युपीआय आयडीवरून बँक खात्यांमध्ये ऑनलाइन वेगवेगळ्या वेळी विविध कारणे सांगून रकमेचा भरणा करावयास भाग पाडले. फिर्यादी युवकाने २४ लाख ५५ हजार ५०५ रुपयांचा भरणा केला. यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद भामट्याने दिला नाही. युवकाने त्याच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट्सॲप, टेलिग्रामसारख्या सोशल साइट्सद्वारेही संपर्क साधला असता कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच युवकाने सायबर पोलिस ठाणे गाठले. 

माजी सैनिकाला १७ लाखांचा चुना 
ओझर गावात राहणारे माजी सैनिक फिर्यादी मंगेश रहाणे यांना ऑनलाइन पद्धतीने सायबर गुन्हेगाराने ‘फॉरेक्स मार्केट’मध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडत १६ लाख ८२ हजार ७९८ रुपयांची फसवणूक केली.

युवक पुण्यात नोकरीला
उच्चशिक्षित २६ वर्षीय फिर्यादी युवक हा पुण्यात नोकरीला होता. तो इंजिनीअर आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच पुण्यातील नोकरी सोडल्याचे पोलिसांनी सांगितले. तो पंचवटीत राहत्या घरी आलेला असताना संशयित सायबर चोराने त्याच्याशी व्हॉट्सॲप, टेलिग्रामद्वारे संपर्क साधून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केली.

Web Title: Engineer 'Crypto' lured Amisha; 25 lakh was lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.