घरकुलासाठीच्या हप्त्यासाठी केली पैशाची मागणी, ९ हजारांची लाच घेणाऱ्या अभियांत्रिकी सहाय्यकास पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:13 PM2022-02-18T22:13:08+5:302022-02-18T22:13:41+5:30
Bribe News : देवणी तालुक्यातील कोनाळी येथील एकास रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले आहे.
लातूर/ देवणी : घरकुलाचा शेवटचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी ९ हजारांची लाच घेताना देवणी पंचायत समितीतील एका स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवणी तालुक्यातील कोनाळी येथील एकास रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले आहे. दरम्यान, घरकुलाचा शेवटचा २० हजारांचा हप्ता फिर्यादीच्या वडिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी येथील पंचायत समितीतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तुकाराम पुंडलिक नरवटे यांनी पंचासमक्ष १० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती ९ हजारांची मागणी करुन ती पंचायत समितीच्या घरकुल विभागात स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी नरवटे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक पंडित रेजितवाड हे करीत आहेत.