इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थिनीची गळा कापून आत्महत्या; भावाचा तीन वर्षांपूर्वी कॅन्सरने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 08:55 AM2021-03-27T08:55:05+5:302021-03-27T08:55:52+5:30
Crime News:विद्यार्थिनीच्या आईचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले होते. यानंतर तिच्या वडिलांनीच तिन्ही मुलींना वाढविले होते. त्यांना आणखी एक भाऊ देखील होता. परंतू त्याचा तीन वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता.
मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने गळा कापून घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तिचे वडील एसी रिपेअरिंग आणि इन्स्टॉलेशनचे काम करतात. त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरी फर्नीचर रिपेअर करण्यासाठी एका कारागिराला बोलावले होते. त्याने रिपेअरिंगचे सामान घरात ठेवले आणि मदतनीसांना आणण्य़ासाठी गेला होता. जेव्हा त्यांची दुसरी मुलगी बाथरुममधून अंघोळ करून बाहेर आली तेव्हा भिंती आणि फरशीवर रक्ताचा सडा पाहून धक्का बसला. (College girl commit suicide after migraine arise in Indore.)
आपल्या बहीणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले धड पाहून जोरजोरात ओरडू लागली. मृतदेहाजवळ इलेक्ट्रीक कटर ठेवला होता आणि त्याची वायर प्लगला लावलेली होती. मुलीने कळविल्यावर त्यांचे वडील तातडीने घरी पोहोचले. विद्यार्थिनीला काहीतरी सांगायचे होते. ती तडफडत होती. मत्र, गळा कापल्याने तिचा आवाज निघत नव्हता. थोड्याच वेळात तिचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले.
ही विद्यार्थिनी मायग्रेनमुळे त्रस्त होती. तिच्यावर उपचारही सुरु होते. लॉकडाऊननंतर तिने सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. तिला आणखी दोन बहीणी आहेत. तिने आत्महत्या का केली याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
20 वर्षांपूर्वी आईचे निधन...
विद्यार्थिनीच्या आईचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले होते. यानंतर तिच्या वडिलांनीच तिन्ही मुलींना वाढविले होते. त्यांना आणखी एक भाऊ देखील होता. परंतू त्याचा तीन वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. विद्यार्थीनीला काही महिन्यांपूर्वीच मायग्रेनचा त्रास असल्याचे समोर आले होते. पोलीस अधिकारी आर पी मालवीय यांनी सांगितले की, तिने स्वत:चा गळा कापला आहे. याचा तपास सुरु आहे. तरुणीचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.