खळबळजनक! ४० मिनिटे...मित्राच्या शरीरावर १०७ वेळा चाकूने वार, प्रायव्हेट पार्टही कापला अन् डोळेही काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 02:26 PM2021-10-29T14:26:11+5:302021-10-29T14:26:27+5:30
England Crime News : शेफने त्याच्यावर ४० मिनिटात १०० पेक्षा जास्तवेळा चाकूने वार केले आणि नंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यासोबतच शेफने आपल्या मित्राचे डोळेही काढले.
इंग्लंडमधून (England Crime News) हत्येची एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. 'द कॉन्ज्यूरिंग ३ : द डेविल मेड मी डू इट' हा हॉरर सिनेमा थिएटरमध्ये बघायला जाण्याआधी एका शेफने आपल्या मित्राची (Chef Murdered Friend) फारच निर्दयीपणे हत्या केली. शेफने त्याच्यावर ४० मिनिटात १०० पेक्षा जास्तवेळा चाकूने वार केले आणि नंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यासोबतच शेफने आपल्या मित्राचे डोळेही काढले.
२० वर्षीय लुईस एसडाउनने १८ वर्षाच्या मार्क विलियम्सला ड्रिंकवर बोलवलं आणि त्याला जंगलात घेऊन गेला. जेव्हा मार्क व्हिस्की आणि कोक पिऊन नशेत होता, तेव्हा एशडाउनने त्याच्यावर वार केले. जवळपास ४० मिनिटांपर्यंत झालेल्या या क्रूर हल्ल्यात त्याने १०७ वेळा चाकूने वार केले. त्याचे डोळे काढले आणि नंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार केला.
या हत्येचा एशडाउने आपल्या फोनवर सात व्हिडीओही रेकॉर्ड केले. एका व्हिडीओत तो आपल्या मित्राच्या डोक्यावर फुटबॉलसारखी लाथ मारत आहे, त्याला मारहाण करत आहे. आरोपी एशडाउनला अटक करण्यात आली आहे आणि त्याला लुईस क्राउन कोर्टात हजर करण्यात आलं. मार्क विलियम्स आणि एशडाउन ६ महिन्याआधीच ऑनलाइनवरून मित्र झाले होते.
२९ मे रोजी दोघांनी एकमेकांना मेसेज केला आणि भेटण्याचा प्लॅन केला. विलियम्सने तयारीसाठी बीअर, व्हिस्की आणि कोक खरेदी केलं होतं. विलियम्स नशेत असताना एशडाउनने त्याच्या चेहरा, डोळे, मान, डोकं, पाठ, प्रायव्हेट पार्ट, छाती आणि उजव्या पायावर १०७ वेळा चाकूने वार केले. नंतर आपला शर्ट आणि पॅंट नाल्यात फेकली.
एशडाउन दुसऱ्या दिवशी आपला मित्र लियाम हॅनसनला भेटला आणि त्याने दारूच्या नशेत हत्या केल्याची मान्य केलं. एशडाउनने त्याला सांगितलं की, त्याने विलियम्स मारलं कारण तो त्याला त्रास देत होता. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.